एक्स्प्लोर

शिवसेनेच्या विधानपरिषद मंत्र्यांवर टांगती तलवार, खांदेपालटाची शक्यता

मुंबई : शिवसेनेच्या खांदेपालटासंदर्भात आज अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या विधानपरिषद गटनेतेपदी अनिल परब यांची वर्णी लागल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेतील सेनेच्या इतर सदस्यांना खांदेपालटाचे स्पष्ट संकेत दिले आहेत. विधानपरिषदेच्या शिवसेना गटनेतेपदी गेल्या काही काळापासून दिवाकर रावते होते. मात्र मंत्रिमंडळात असल्याने त्यांना शिवसेनेची भूमिका नीट मांडता येत नव्हती. नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अनिल परब यांनी मोलाची कामगिरी करत शिवसेनेला आपला गड राखण्यास मदत केली होती. त्याचंच बक्षीस म्हणून त्यांची विधानपरिषद गटनेतेपदी वर्णी लागल्याचं बोललं जात आहे. महत्त्वाचं म्हणजे खांदेपालटात ज्येष्ठ मंत्र्यांवर टांगती तलवार आहे. यासंदर्भात आज शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांची आमनेसामने बैठक होणार आहे. शिवसेनेच्या विधान परिषदेच्या गटनेतेपदी अनिल परब : सूत्र विधानपरिषदेतील मंत्र्यांवर टांगती तलवार आरोग्य मंत्री दीपक सावंत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना पक्षसंघटना बांधणीच्या जबाबदारीसाठी मंत्रिमंडळातून पद मुक्त केली जाण्याची शक्यता आहे. गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांना आमदारांची नाराजी भोवण्याची चिन्हं आहेत, तर आक्रमक असलेल्या सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांची कॅबिनेटपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. येत्या काळात शिवसेनेच्या अजेंड्यावर ‘मिशन विदर्भ’ असल्याने आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत चांगली कामगिरी केल्याबद्दल राज्यमंत्री संजय राठोड यांना बढती मिळू शकते. तर ग्रामीण भागातील चेहऱ्यांना संधी देण्यावर पक्ष नेतृत्वाचा भर असेल. यामध्ये कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर, रत्नागिरीचे उदय सामंत, यवतमाळचे तानाजी सावंत, निफाडचे अनिल कदम, पारनेर (अहमदनगर) - विजय औटी आणि पाटणचे शंभूराजे देसाई यांची नावं आघाडीवर आहेत. संबंधित बातम्या शिवसेना मंत्र्यांच्या खांदेपालटाची चर्चा, अनेक मंत्र्यांना डच्चू? शिवसेना आमदार आणि मंत्र्यांची मातोश्रीवर महत्त्वाची बैठक उद्धव ठाकरेंकडून पक्षांतर्गत मोठ्या फेरबदलांचे संकेत : सूत्र

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime: नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
Jalgaon Crime: ‘काका, तुमचे पैसे पडलेत’; शेतकरी नोटा उचलण्यासाठी खाली वाकताच चोरट्यांनी दोन लाखांवर मारला डल्ला, जळगावात नेमकं काय घडलं?
‘काका, तुमचे पैसे पडलेत’; शेतकरी नोटा उचलण्यासाठी खाली वाकताच चोरट्यांनी दोन लाखांवर मारला डल्ला, जळगावात नेमकं काय घडलं?
Totaladoh Dam Water Level : नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! तोतलाडोह धरणामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती, बाष्पीभवनाने चिंता वाढवली
नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! तोतलाडोह धरणामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती, बाष्पीभवनाने चिंता वाढवली
Navratri 2026 Saptashrungi Gad: सप्तशृंगगडावर नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी; भाविकांसाठी 24 तास मंदिर खुले, खासगी वाहनांना प्रवेशबंदी, एसटीनेच करावा लागणार प्रवास
सप्तशृंगगडावर नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी; भाविकांसाठी 24 तास मंदिर खुले, खासगी वाहनांना प्रवेशबंदी, एसटीनेच करावा लागणार प्रवास

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: घरी गेला; त्या गोष्टीवरून वाद अन् तरूणानं आजीला संपवलं, घटनेनंतर पोलीस ठाण्यात गेला, घटनेनं पोलिसही चक्रावले
घरी गेला; त्या गोष्टीवरून वाद अन् तरूणानं आजीला संपवलं, घटनेनंतर पोलीस ठाण्यात गेला, घटनेनं पोलिसही चक्रावले
Navratri 2026 Saptashrungi Gad: सप्तशृंगगडावर नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी; भाविकांसाठी 24 तास मंदिर खुले, खासगी वाहनांना प्रवेशबंदी, एसटीनेच करावा लागणार प्रवास
सप्तशृंगगडावर नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी; भाविकांसाठी 24 तास मंदिर खुले, खासगी वाहनांना प्रवेशबंदी, एसटीनेच करावा लागणार प्रवास
CJP Delhi Protest Updates: ट्रेन्स रद्द, मेट्रो बंद, इंटरनेट सस्पेंड अन् राजधानीच्या सीमांवर BSFचा वेढा; CJP आंदोलनापूर्वी राजधानी दिल्लीला चोहीकडून घेरा, आंदोलकांना रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
ट्रेन्स रद्द, मेट्रो बंद, इंटरनेट सस्पेंड अन् राजधानीच्या सीमांवर BSFचा वेढा; CJP आंदोलनापूर्वी राजधानी दिल्लीला चोहीकडून घेरा, आंदोलकांना रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
Parinay Fuke : पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत कैफियत मांडली, वैफल्यग्रस्त शेतकऱ्यानं दोनच दिवसात टोकाचं पाऊल उचललं; भंडाऱ्यातील सपाटे कुटुंबीयांचं सांत्वन करत परिणय फुकेंचा मदतीचा शब्द
पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत कैफियत मांडली, वैफल्यग्रस्त शेतकऱ्यानं दोनच दिवसात टोकाचं पाऊल उचललं; भंडाऱ्यातील सपाटे कुटुंबीयांचं सांत्वन करत परिणय फुकेंचा मदतीचा शब्द
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
Embed widget