Lingayat Samaj Protest : मुंबईतील लिंगायत समाजाचा मोर्चा स्थगित, 80 टक्के मागण्या मान्य
Lingayat Samaj Protest : मुंबईतील आझाद मैदानात सुरु असलेला लिंगायत समाजाचा मोर्चा स्थगित झाला आहे.
Lingayat Samaj Protest : मुंबईतील आझाद मैदानात सुरु असलेला लिंगायत समाजानं मोर्चा मागे घेतला आहे. अविनश भोसीकर आणि विनय कोरे यांनी मोर्चा माघार घेत असल्याची घोषणा केली. आमच्या 70 टक्के मागण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे आजचा आझाद मैदानातला मोर्चा स्थगित करत आहोत. काही केंद्राचे विषय आहेत त्या मागण्यासाठी लढाई पुढे सुरू राहील, असे अविनाश भोसीकर यांनी सांगितलं. तर 22 जानेवारीला समाजाच्या मागण्यावर, आमची चर्चा झाली होती. यासंदर्भात आम्ही त्यांचा काही मागण्यांवर सकारात्मक आहोत, त्या मान्य केल्या जातील. याचा पाठपुरावा स्वतः मी करणार आहे. काही मागण्या केंद्रातील सरकार संदर्भात आहेत, त्यावर पुढे अभ्यास आणि चर्चा करू , तो राष्ट्रीय निर्णय आहे, असे विनय कोरे म्हणाले. आमच्या 70 ते 80 टक्के मागण्या मान्य झाल्या आहेत. त्याबद्दल सरकारचे आभार व्यक्त करतो.. असे अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे विजय हतुरे म्हणाले.
लिंगायत समाजाच्या मोर्चेकऱ्यांसोबत बोलण्यासाठी सरकारचे प्रतिनिधी आले आहेत. या समजात माझा जन्म झालाय हे माझं भाग्य आहे. मुंबईत तुम्ही आपल्या मागण्यांसाठी आलात त्याबरोबर स्वामी ही आलेत. लढणाऱ्या सर्व पदाधिकऱ्यांचं आणि मेहनत घेणाऱ्या सर्वांच कौतुक आहे. गेल्या आठवड्यात आपल्या मागण्यांवर चर्चा झाली होती. जी चर्चा झाली त्या संधर्भात मी आपल्याला वस्तू स्थिती सांगायला आलोय. जैन समाजालाही सांविधनिक मान्यता अद्याप नाही, मात्र आपण प्रयत्न करतोय. हा राष्ट्रीय स्तरावर कोणत्या धर्माला मान्यता द्यायची याचा अभ्यास सुरू आहे. यासाठी कायद्याचा ही अभ्यास सुरू झालाय. भाषिक अल्पसंख्याक म्हणुन अनेक सोयी सुविधा देण्यासाठी सरकारने सकारात्मकता दाखवली आहे, असे विनय कोरे म्हणाले.
बसवेश्वर यांच्या नावाचं विद्यापीठ तयार करण्यासाठी मान्यता द्यावी, अशी मागणी केली आहे. राज्य सरकारने ही मागणी मान्य केली आहे. बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली आहे. येणाऱ्या अधिवेशनापूर्वी घोषणा करण्याची आग्रही मागणी केली ती मान्य होईल, असे विनय कोरे यांनी सांगितलं. महाराष्ट्र विधिमंडळात बसवेश्वरांचा पुतळा बसवण्याची मागणी केली होती ,ती राज्यसरकारने मान्य केली. जागा शोधणं सुरू आहे. उपलब्ध झाली नाही तर तिथे तैलचित्र लावण्याचं मान्य करण्यात आलं आहे, असेही कोरे यांनी सांगितलं.
Lingayat Religion Mahamorcha : काय आहेत मागण्या?
- लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता द्यावी
- राज्यातील लिंगायत धर्मियांना अल्पसंख्यांक दर्जा जाहिर करावा
- सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुका येथे मंजूर असलेल्या महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकाचे काम त्वरीत सुरु करण्यात यावे
- मुंबई येथील विधानभवन परिसरात महात्मा बसवेश्वरांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात यावा.
- महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे.
- गांव तेथे रुद्रभुमी ( स्मशानभुमी) आणि गांव तेथे अनुभव मंटप ( सभामंडप ) करण्यात यावे.
- लिंगायत समाजातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर वसतिगृह निर्माण करण्यात यावे.
- राष्ट्रीय जनगणनेत लिंगायतांसाठी स्वतंत्र कॉलम देण्यात यावे.
- वीरशैव लिंगायत व हिंदू लिंगायत अशी नोंद असलेल्यांचा ओबीसी घटकामध्ये समावेश नाही, त्यामुळे या घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि सरकारी नोकरीची संधी मिळत नाही. सरकारने शुध्दीपत्रक काढून ओबीसीमध्ये समावेश करावा.