एक्स्प्लोर
कोल्हापुरात लिंगायत समाजाचा महामोर्चा
कोल्हापुरात लिंगायत समाजाने विविध मागण्यांसाठी महामोर्चाचा एल्गार पुकारला आहे. “मी लिंगायत, माझा धर्म लिंगायत” असा नारा देत राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर लिंगायत समाजबांधव कोल्हापुरात दाखल झाले आहेत.
कोल्हापूर : कोल्हापुरात लिंगायत समाजाने विविध मागण्यांसाठी महामोर्चाचा एल्गार पुकारला आहे. “मी लिंगायत, माझा धर्म लिंगायत” असा नारा देत राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर लिंगायत समाजबांधव कोल्हापुरात दाखल झाले आहेत.
कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात अखिल भारतीय लिंगायत समाजातर्फे आयोजित महामोर्चाला सुरुवात झाली आहे. लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता मिळावी, अल्पसंख्याकांचा दर्जा मिळावा या प्रमुख मागण्यांसह इतर विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय लिंगायत समाजाच्यावतीने कोल्हापुरात हा महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. इतर समाजबांधवांनीही या मोर्चाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे.
डोक्यावर ‘लिंगायत स्वतंत्र धर्म, मी लिंगायत’ लिहिलेल्या टोप्या, गळ्यात स्कार्फ आणि हातात महात्मा बसवण्णा यांचे छायाचित्र असलेले भगवे झेंडे घेऊन लिंगायत समाजाचे लोक या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement