एक्स्प्लोर
दुष्काळासंदर्भात लवकर निर्णय घ्या, शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
दुष्काळावर मात करण्यासाठी लागणाऱ्या उपाययोजनांची टिपण्णीही शरद पवार यांनी पत्रासोबत जोडली आहे.
मुंबई: दुष्काळासंदर्भात लवकर निर्णय घ्या, अशा आशयाचं पत्र शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीसांना पाठवलं आहे. राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळाचं गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने निश्चित कृती कार्यक्रम हाती घ्यावा, तसंच वेळीच पाऊले उचलून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणीही या पत्रातून पवारांनी केली आहे.
महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पर्जन्यमान कमी झाल्याने ऐन हिवाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. दुष्काळाचं दुर्भिक्ष जाणवू लागलं आहे, परतीच्या पावसानेही निराशा केल्याने खरीपाचे पीक बळीराजाच्या हातचं गेलं आहे. रब्बी पिकांची पेरणी संकटात आली आहे. पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याच्या टंचाईमुळे पशूधनही धोक्यात आले आहे. त्यामुळे राज्य सरकारने कृती कार्यक्रम हाती घ्यावा अशी मागणी शरद पवारांनी केली आहे.
दुष्काळावर मात करण्यासाठी लागणाऱ्या उपाययोजनांची टिपण्णीही शरद पवार यांनी पत्रासोबत जोडली आहे. तसंच दुष्काळाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष घालावे, अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
पुणे
भारत
Advertisement