एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राष्ट्रपती निवडणुकीसाठी मला सोडा : छगन भुजबळ
मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आपल्याला विधिमंडळात जाऊन मतदान करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पीएमएलए कोर्टाला केली आहे. यावर कोर्टात सोमवारी पुढील सुनावणी आहे.
ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी छगन भुजबळ यांच्या विनंती अर्जाला विरोध केला आहे.
ईडीनं विरोध करताना तीन प्रमुख मुद्दे मांडले आहेत :
- पीएमएलए कायद्याच्या कलम 44 नुसार अशा व्यक्तीला घटनेच्या 54 व्या कलमानुसार मिळणाऱ्या घटनात्मक अधिकाराबद्दल आदेश देण्याचा अधिकार विशेष कोर्टाला नाही आहे.
- पीएमएलए कोर्ट एखाद्या कैद्याविषयी विशेष सुविधा देण्याचे आदेश देऊ शकत नाही, असा आदेश हायकोर्ट रिट याचिकेवरच देऊ शकते.
- लोकप्रतिनिधी कायद्याचं कलम 62(5) राष्ट्रपती निवडणुकीसाठी लागू करता येतं का याची केस सुप्रीम कोर्टासमोर सुरु आहे, त्यामुळे या कोर्टाने त्या संदर्भात कोणतेही आदेश देऊ नयेत. घटनात्मक खंडपीठानं याचा निर्णय घ्यावा.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement