एक्स्प्लोर
लक्ष्मीकांत देशमुख 91 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी
91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड झाली आहे. गुजरातमधील बडोद्यात होणाऱ्या साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष भूषवतील.
नागपूर : 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड झाली आहे. गुजरातमधील बडोद्यात होणाऱ्या साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष भूषवतील. लक्ष्मीकांत देशमुख हे विदर्भातील लेखक असून त्यांची आतापर्यंत 13 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.
आज रविवारी 10 डिसेंबर रोजी नागपुरात आज साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी मतमोजणी झाली. या मतमोजणीत लक्ष्मीकांत देशमुख यांना 427 मतं मिळाली, तर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले रविंद्र शोभणे यांना 357 मतं मिळाली.
दरम्यान या पंचरंगी लढतीत या दोघांशिवाय राजन खान, किशोर सानप आणि रविंद्र गुर्जर देखील रिंगणात होते. यंदा ब़डोद्यात मराठी साहित्य संमेलन होत आहे.
या निवडणुकीसाठी 1070 मतदार होते, ज्यापैकी 896 लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यातील 14 मतं ही अवैध ठरली.
लक्ष्मीकांत देशमुख यांची साहित्यसंपदा
अंधेरनगरी - कथा
इन्कलाब विरुद्ध जिहाद - कादंबरी
नंबर 1 - कथासंग्रह
ऑक्टोपस - कथासंग्रह
पाणी! पाणी! -
प्रशासननामा - कायदेविषयक, सामाजिक लेखन
अग्नीपथ - कथासंग्रह
अविस्मरणीय कोल्हापूर - माहितीपर लेखन
बखर – भारतीय प्रशासनाशी – राजकीय, सामाजिक लेखन
दूरदर्शन हाजीर हो - नाटक
मधुबाला ते गांधी - व्यक्तीचित्रण
सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement