एक्स्प्लोर

लातुरात क्लास संचालकावर गोळ्या झाडणारा निलंगेकरांचा माजी सुरक्षारक्षक

क्लास संचालक अविनाश चव्हाण हत्या प्रकरणात अटक केलेल्यांमध्ये कॅबिनेट मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा माजी सुरक्षारक्षक करण सिंह याचा समावेश असल्याचं समोर आलं आहे.

लातूर : लातूरमध्ये 'स्टेप बाय स्टेप' या क्लासच्या संचालकावर गोळ्या झाडणारा आरोपी चक्क मंत्र्यांचा माजी सुरक्षारक्षक असल्याचं समोर आलं आहे. या बातमीमुळे अवघ्या मराठवाड्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी क्लास संचालक अविनाश चव्हाण हत्या प्रकरणात ज्या पाच जणांना अटक केली आहे, त्यात कॅबिनेट मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा माजी सुरक्षारक्षक करण सिंह याचा समावेश असल्याचं समोर आलं आहे. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि व्हॉट्सअॅपवर संभाजी पाटील निलंगेकर आणि करण सिंह यांच्या घनिष्ट संबंधांचे पुरावे देणारे फोटो अवघ्या महाराष्ट्रात फिरु लागले. त्यामुळे मंत्र्यांचा माजी सुरक्षारक्षक हा सुपारी किलर आहे का, असे प्रश्न विचारले जात आहेत. संभाजी पाटील निलंगेकर हे लातुरातील निलंग्यातून भाजपचे आमदार असून त्यांच्याकडे कामगार कौशल्य विकास मंत्रालयाची जबाबदारी आहे. लातुरातील अविनाश चव्हाण हत्या प्रकरणाचं गूढ उकललं! दरम्यान, करण सिंह आपला सुरक्षारक्षक नव्हता, असा दावा संभाजी पाटील निलंगेकरांनी केला आहे. तो आपल्या विधानसभा मतदारसंघातला कार्यकर्ता होता. करणला तुमच्यासोबत कामाला ठेवा, अशी विनवणी त्याच्या कुटुंबीयांनी केल्यानंतर तो आपल्यासोबत होत. करण कधी शिवसेनेचा कार्यकर्ता होता, तर कधी मनसेचा. दोन महिन्यापासून तो राजकीय ग्रुपचाही सभासद होता, असंही निलंगेकर म्हणाले. अनेक कार्यक्रमांमध्ये उत्साही कार्यकर्ते आमदार-मंत्र्यांसोबत फोटो काढतात, मात्र त्यांचा संबंध असेलच असं नाही. हत्येसारखी घटना जिल्ह्यासाठी चांगली नाही, अशी प्रतिक्रिया संभाजी पाटील निलंगेकरांनी दिली. व्यावसायिक स्पर्धेतून आपल्याच भागीदाराला संपवण्यासाठी खासगी शिकवणी संचालक चंदनकुमार याने अविनाश चव्हाण यांच्या हत्येसाठी करण सिंहला 20 लाखांची सुपारी दिली होती. त्यानंतर दोनच दिवसांपूर्वी लातूरमध्ये मध्यरात्री 1 वाजता अविनाश चव्हाण यांची हत्या झाली होती. कोण आहे चंदनकुमार शर्मा? मुख्य आरोपी चंदनकुमार शर्मा हा मूळचा बिहारमधील असून, गेल्या अनेक वर्षांपासून लातूर येथे राहत आहे. बीमॅक झालेला चंदनकुमार हा ‘कुमार मॅथ्स’ नावाने क्लास चालवत होता. आणि दोघांमधील वाद वाढला! विशेष म्हणजे चंदनकुमार अविनाश चव्हाण यांचा व्यवसायातील पार्टनर होता. क्लासमध्ये केवळ सात विद्यार्थी होते. मग अविनाश त्यात आला आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढली. नंतर अविनाश वेगळा झाला आणि ‘स्टेप बाय स्टेप’ क्लास सुरु केले. यातूनच दोघांमधील वाद वाढला. हत्येची सुपारी ते हत्या.... चंदनकुमार शर्मा याने महेशचंद्र गोगडे रेड्डी याला अविनाश चव्हाण यांच्या हत्येची सुपारी दिली. महेशचंद्रने शरद घुमे याला हे काम सोपवले. शरद घुमेने त्याच्या गावात राहणाऱ्या करण सिंग घहीरवाल याला सोबत घेतले आणि अविनाश चव्हाणांवर गोळीबार केला. चंदनकुमार याने 20 लाख रुपयांची सुपारी दिली. त्यातील साडेआठ लाख रुपये देण्यात आले होते. हत्येसाठी शस्त्र परळी येथील इराणी माणसाने बिहारमधून मिळवून दिले. पंधरा राऊंडची एक पिस्तूल आणण्यात आली. दुसऱ्याच्या गाडीवरुन रेकी करण्यात आली. त्यानंतर पाठलाग करुन अविनाश चव्हाणांच्या गाडीजवळ आले आणि पार्किंग लाइट ऑन करुन बोलत असताना करणने गोळी चालवली. त्यात अविनाश चव्हाण यांचा मृत्यू झाला. काय झालं त्या दिवशी? लातुरातील प्रसिद्ध अशा ‘स्टेप बाय स्टेप’ क्लासचे संचालक अविनाश चव्हाण यांची 24 जूनच्या रात्री हत्या झाली. आपल्या घराकडे जात असताना शिवाजी शाळेजवळ त्यांच्या गाडीवर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. यात एक गोळी त्याच्या उजव्या छातीत लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अविनाश चव्हाण स्वत:च गाडी चालवत होते. यावेळी गाडीत ते एकटेच होते. त्यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. चव्हाण यांच्यावर हल्ल्यासाठी हल्लेखोर दबा धरुन बसला होता की त्यांचा पाठलाग करत होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच लातूरचे पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड, डीवायएसपी हिंमत जाधव, डीवायएसपी गणेश किंद्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय सुधाकर बावकर, पीआय केशव लटपटे यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी हजर होते. अविनाश चव्हाण यांची हत्या आणि क्लासेसची स्पर्धा शिक्षणामुळे प्रगती होते हे खरं असलं, तरी त्याच शिक्षणाला पैशांचा दर्प आला की, काही तरी अघटित घडणार हे निश्चित असतं. लातूरमध्ये असंच काहीसं झालं. ज्याने विद्यार्थ्यांच्या बक्षिसांवर एक कोटी रुपये खर्च केले. ज्याने जिमच्या उद्घाटनासाठी सनी लिओनीला लातूरमध्ये आणलं होतं, त्या अविनाश चव्हाण यांची हत्या झाली आहे. 12 जून 2018 रोजी 'स्टेप बाय स्टेप' क्लासचे संचालक अविनाश चव्हाण यांनी गुणवान विद्यार्थ्यांचा सत्कार करताना तब्बल एक कोटी रुपयांची बक्षीसं वाटली होती. त्यानंतर बरोबर 13 दिवसानंतर अविनाशची रात्री दीड वाजता दोन गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गेल्या वर्षी 31 मे रोजी अविनाशनं आपल्या जिमच्या उद्गाटनासाठी सनी लिओनिला खास विमानानं लातूरला आणलं होतं. तेव्हापासून अविनाश चव्हाण चर्चेत होते.
लातुरातील ‘स्टेप बाय स्टेप’ क्लासच्या संचालकाची हत्या
निवृत्त पोलिसाचा मुलगा असलेल्या अविनाश यांनी दोन वर्षांपूर्वी खाजगी शिकवणी सुरु केली. त्यातून आलेल्या पैश्यातून लातूर शहरात मुख्य रस्त्यावर जिम सुरु केलं. नांदेडच्या शाखेचं कामही जोरात सुरु होतं. लातूर पॅटर्नचा गवगवा झाल्यापासून लातूर शहरात सुमारे 100 शिकवण्या सुरु झाल्या आहेत. नियमित आणि पुन्हा परीक्षा देणारे असे 25 हजार विद्यार्थी या शहरात शिकतात. तीन विषयांसाठी मिळून प्रत्येक विद्यार्थ्याला 50 हजार फिस द्यावी लागते. त्यातून सुमारे 1200 कोटींचा बेबंद व्यवहार होतो. कोणताही शिकवणीवाला कसलाच कर भरत नाही. या साम्राज्यात कोणीची भर होऊ नये यासाठी प्रसंगी क्लास चालकांमध्ये हाणामारीचे आणि तणावाचे नित्य नेमाने प्रकार घडतात. क्लास चालकांकडून खंडणी उकळणारी समांतर टोळ्या इथे काम करतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे फिरकले नाही; संतोष देशमुख प्रकरणावर अधिवेशनात व्यापक चर्चा नाही
राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे फिरकले नाही; संतोष देशमुख प्रकरणावर अधिवेशनात व्यापक चर्चा नाही
नितेश राणेंना मल्हारी पगडी बांधली, पण 'मल्हार' नावाला विरोधच; जेजुरीच्या मार्तंड विश्वस्त मंडळात दोन गट
नितेश राणेंना मल्हारी पगडी बांधली, पण 'मल्हार' नावाला विरोधच; जेजुरीच्या मार्तंड विश्वस्त मंडळात दोन गट
Temperature Alert: नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 5PM 12 March 2025Satish Bhosale Khokya News | सतिश भोसलेला प्रयागराजमधून अटक; सुरेश धस, सुप्रिया सुळे आणि अंजली दमानिया काय म्हणाल्या?Top 25 Superfast News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 12 March 2025ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 4PM 12 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे फिरकले नाही; संतोष देशमुख प्रकरणावर अधिवेशनात व्यापक चर्चा नाही
राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे फिरकले नाही; संतोष देशमुख प्रकरणावर अधिवेशनात व्यापक चर्चा नाही
नितेश राणेंना मल्हारी पगडी बांधली, पण 'मल्हार' नावाला विरोधच; जेजुरीच्या मार्तंड विश्वस्त मंडळात दोन गट
नितेश राणेंना मल्हारी पगडी बांधली, पण 'मल्हार' नावाला विरोधच; जेजुरीच्या मार्तंड विश्वस्त मंडळात दोन गट
Temperature Alert: नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
Udayanraje Bhosale on Nitesh Rane : मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं त्यांनी खावं; उदयनराजेंनी मंत्री नितेश राणेंनाही उघडं पाडलं
मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं त्यांनी खावं; उदयनराजेंनी मंत्री नितेश राणेंनाही उघडं पाडलं
Video : माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही; जयंत पाटलांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
Video : माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही; जयंत पाटलांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
होलिकेच्या राखेचे आध्यात्मिक महत्त्व आणि श्रद्धा!
होलिकेच्या राखेचे आध्यात्मिक महत्त्व आणि श्रद्धा!
Shaktipeeth Expressway : मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल पण, शक्तिपीठ नकोच, बंटी पाटलांची आग्रही भूमिका, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल पण, शक्तिपीठ नकोच, बंटी पाटलांची आग्रही भूमिका, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Embed widget