एक्स्प्लोर
मोबाईल बॅटरीच्या स्फोटात युवकाच्या हाताची बोटं तुटली
मोबाईल सुरु होत नाही म्हणून बॅटरी काढून पुन्हा बसवत असताना हा स्फोट झाला. या स्फोटात बालाजी वाघमारे गंभीररित्या जखमी झाला आहे.

लातूर : मोबाईल बॅटरीचा स्फोट झाल्यानं तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना लातूर जिल्ह्यातील अनसरवाडा गावात घडली आहे. जखमींपैकी एकाच्या हाताची दोन्ही बोटं तुटली असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या सर्वांवर शासकीय दवाखान्यात उपचार सुरु आहे. मोबाईल सुरु होत नाही म्हणून बॅटरी काढून पुन्हा बसवत असताना हा स्फोट झाला. या स्फोटात बालाजी वाघमारे गंभीररित्या जखमी झाला आहे. या स्फोटात त्याच्या हाताची दोन बोटे तुटली आहे. तर त्याच्या चेहऱ्यावर आणि इतर ठिकाणीसुद्घा जखमा झाल्या आहेत. सध्या बालाजीवर लातूरच्या शासकीय दवाखान्यात उपचार कऱण्यात येत आहेत. बालाजी सोबत त्याचे दोन मित्र सहदेव येवते आणि प्रशांत कांबळे हे दोघेही बसलेले होते. बॅटरीच्या स्फोटात सहदेव आणि प्रशांतही जखमी झाले. दवाखान्यात प्राथमिक उपचार करून या दोघांना घरी पाठविण्यात आले.
आणखी वाचा






















