एक्स्प्लोर

लातूर जिल्ह्यात ग्रामीण भागात वाढतोय कोरोना, संसर्गात झपाट्याने वाढ

लातूर जिल्ह्यात दररोज कोरोना बाधितांचा आकडा वाढतच जात आहे. काल लातूर जिल्ह्यात 414 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. लातूर आणि उदगीर पाठोपाठ आता जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे.

लातूर: लातूर जिल्ह्यात दररोज कोरोना बाधितांचा आकडा वाढतच जात आहे. काल लातूर जिल्ह्यात 414 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा एकूण आकडा हा 9115 वर गेला आहे. काल नऊ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण मृत्यूचा आकडा हा 305 वर गेला आहे. 2241 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 6569 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. लातूर आणि उदगीर पाठोपाठ आता जिल्ह्यातील ग्रामीण भागात ही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. लातूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात रुग्ण संख्या वाढतच चालली असताना आता छोट्या मोठ्या गावातही दुहेरी आणि तिहेरी आकड्यात रुग्ण संख्या गेली आहे. लातूर जिल्ह्यातील बाजारपेठ असलेले गाव म्हणजे मुरुड. या गावात कोरोनाग्रस्तांचा आकडा शंभरी पार केला आहे. काल एकाचा दिवसात 30 हजार लोकसंख्या असलेल्या या गावातील तीन लोकांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे आणि 17 नवीन रुग्णाची नोंद झाली आहे. यामुळे गावात दशहत पसरली आहे. गावात अवघ्या काही दिवसात सहा लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत असलेले सर्वात मोठे गाव. नावाजलेली बाजारपेठ असलेल्या या गावात उस्मानाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्यातील व्यापारी येत असतात. गावातील अनेक व्यापारी कोरोनाग्रस्त झाले आहेत. यामुळे गावकरी सतर्क झाले आहेत. या भागातील 60 पेक्षा जास्त गावाचा बाजार आणि व्यवहार मुरुड येथे होत असतो. संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी आता जनता कर्फ्यूचा विचार पुढे आला आहे. यावर उपाय योजना करण्यासाठी ग्रामपंचयतीने आता पाच दिवसांचा जनता कर्फ्यू घोषित केला आहे. येत्या सोमवारपासून पुढील पाच दिवस जनता कर्फ्यू असणार आहे. या काळात गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे. जनता कर्फ्यूच्या पाच दिवसाच्या काळात ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामीण रूग्णालयात दिवसभर फिवर क्लिनिक सुरू करून एक हजार अँटीजन किटद्वारे संशयित रूग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. या उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. गावातील अनेक रुग्ण सर्दी, ताप आणि खोकला झाल्यास औषध विक्रेत्या जात त्यावर औषधे घेत घरीच उपचार घेत गावभर फिरत आहेत. यातून कोरोनाचा धोका वाढला आहे. अशी औषधे घेण्यासाठी कोणीही आले तर त्याची माहिती ग्रामपंचयत कार्यालयास करने बंधनकारक करण्यात आले आहे. अशा  रुग्णांची अॅंटीजन टेस्ट केल्याशिवाय त्यास औषध विक्री करु नये असा निर्णय घेण्यात आला आहे.अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांची तपासणी गावातील खासगी डॉक्टर यांनी करु नये. अशा रुग्णास सरळ ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क करावा त्या व्यक्तिची तपासणी सह इतर बाबी ग्रामपंचायत करवून घेईल. तपासणीत रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यास त्या व्यक्तीच्या संपर्कातील लोकांच्या तपासणी करण्यात येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
Santosh Deshmukh Case : दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh Beed PC : ॲट्रॉसिटीचा गुन्हा का दाखल केला नाही..? धनंजय देशमुख यांचे खरमरीत सवालDhananjay Deshmukh Protest : जरांगेंनी हात जोडले, एसपींनी विनंती केली;अखेर 2 तासांनी देशमुख खाली आलेDhananjay Deshmukh Beed Protest:मनोज जरांगेंच्या विनंतीला प्रतिसाद, धनंजय देशमुख टाकीवरुन खाली उतरलेDhananjay Deshmukh Beed Protest : धनंजय देशमुख यांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन; मनोज जरांगे आंदोलनस्थळी दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
Santosh Deshmukh Case : दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
उद्विग्न धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त
धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त "आकां" चे सरताज देवेंद्र फडणवीसजी; सुषमा अंधारेंची शेलक्या शब्दात टीका
Gold Rate Today:एकीकडे रुपया कमजोर, शेअर बाजारात घसरण, दुसरीकडे सोने -चांदीच्या दरात तेजी, जाणून घ्या दर
रुपया कमजोर, बाजारात घसरण,गुंतवणूकदारांची सोने चांदीला पसंती, दरात तेजी, जाणून घ्या दर
Santosh Deshmukh : मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये  महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या
मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या
Yohan Poonawalla : ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
Embed widget