एक्स्प्लोर

राज्यावर दुष्काळाचे सावट, ऑगस्टमध्ये 1901 नंतर सर्वात कमी पावसाची नोंद

maharashtra rain update : ऑगस्ट महिन्यात भारतात शतकातील सर्वात कमी पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.  

मुंबई : भारतासह राज्यावर दुष्काळाचे संकट उभे ठाकले आहे. तीन महिन्यात पावसाची मोठी तूट दिसून आली आहे. महाराष्ट्र आणि केरळमध्ये पावसाने पाठ फिरवल्याचे दिसलेय. ऑगस्ट महिन्यात भारतात शतकातील सर्वात कमी पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. आतापर्यंत ऑगस्ट महिन्यात फक्त 160 मिमीच्या जवळपास पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्ट 2023 हे मान्सून वर्ष 1901 नंतरचा सर्वात कोरडा ऑगस्ट महिना म्हणून नोंदवला गेला आहे. त्यामुळे यंदा दुष्काळाची स्थिती ओढावली आहे. 

१ जूनपासून संपूर्ण देशात मान्सूनमध्ये पावसाची तूट वाढत गेली. ऑगस्टअखेरपर्यंत देशातील पावसाची तूट 9 टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. त्यातच पुन्हा एकदा मान्सून ब्रेकची स्थिती असल्याने ही तूट आणखी वाढण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. देशातील काही भागात सध्या चांगला पाऊस (Rain) झाला आहे. तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या 22 टक्के पावसाची तूट झाल्याचे पाहायला मिळत आहे. मराठवाड्यात देखील 1 जूनपासून सरासरीच्या 19 टक्के पावसाची तूट पाहायला मिळत असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 

हवामान विभागानं देशात आत्तापर्यत झालेल्या पावसाची माहिती दिली आहे. देशात सरासरीच्या 9 टक्के पाऊस कमी झाला आहे. आत्तापर्यंत देशात 91 टक्के पाऊस झाला आहे. यामध्ये केरळमध्ये यावर्षी पावसाची मोठी तूट पाहायला मिळात आहे. जूनपासून केरळात आत्तापर्यंत सरासरीच्या 48 टक्के पावसाची तूट झाली आहे. 

ऑगस्ट महिन्याचा विचार केला तर राज्यात सरासरीच्या उणे 58 टक्के तूट निर्माण झाली आहे. कारण, ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या फक्त 42 टक्के पाऊस झाला आहे. सर्वात विदारक परिस्थिती मराठवाड्यात आहेत. कारण तिथं सरासरीच्या केवळ 28 टक्के पाऊस झाला आहे. त्याखालोखाल मध्य महाराष्ट्र आणि कोकणात केवळ 36 टक्के पाऊस पडला आहे. राज्यातील 15 जिल्ह्यात पावसाच्या सरासरीतली तूट मोठी आहे. या मोठ्या तुटीमुळे आणि पुढचे काही दिवस पावसाची शक्यता नसल्यानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: नाशिक जिल्ह्यात पुन्हा सौम्य भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये चिंता
Maharashtra Live blog updates: नाशिक जिल्ह्यात पुन्हा सौम्य भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये चिंता
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला अद्याप पोलिसांची परवानगी नाही, प्रशांत जगताप दंड थोपटत म्हणाले....
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला अद्याप पोलिसांची परवानगी नाही, प्रशांत जगताप दंड थोपटत म्हणाले....
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Embed widget