एक्स्प्लोर

Lata Mangeshkar : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लतादीदींना आदरांजली, मंगेशकर कुटुंबीयांचं केलं सांत्वन

प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शोक व्यक्त केला.

Lata Mangeshkar Last Rites : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी रविवारी (6 फेब्रुवारी) वयाच्या 93व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रविवारी सायंकाळी सात वााजता शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. लतादीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी शिवाजी पार्क परिसरात हजारोंचा जनसागर लोटला होता. प्रचंड शोकाकुल वातावरणात साश्रू नयनांनी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. लतादीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले होते. शिवाजी पार्कवर नरेंद्र मोदींकडून लतादीदींना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मोदींकडून मंगेशकर कुटुंबीयांचं सांत्वन करण्यात आले. 

प्रभूकुंज निवसस्थानावर दुपारी 12.30 ते 3 वाजेपर्यंत लतादीदींचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर लदादीदींचं पार्थिव विशेष लष्करी वाहनातून शिवाजी पार्क येथे आणलं होतं.  त्यापूर्वी पोलिसांनी लतादीदींना मानवंदना दिली. दुपारी तीन वाजता लतादीदींची अंत्ययात्रा निघाली होती. यावेळी लतादीदींचं अंतिम दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गर्दी जमली होती. पेडर रोड, हाजी-अली, वरळी नाडा, प्रभादेवी, सिद्धीविनायक मंदीर यामार्गे शिवाजी पार्कपर्यंत अंत्ययात्रा पोहचली. संपूर्ण मंगेशकर कुटुंबिय पार्थिवासोबत होतं. अंत्ययात्रेला चाहत्यांची गर्दी जमली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर दिग्गज मान्यवर शिवाजी पार्कवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लतादीदींना अभिवादन केलं. त्यानंतर मंगेशकर कुटुंबीयांचं सांत्वनही केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी चार वाजण्याच्या सुमारास मुंबईत दाखल झाले. 

प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शोक व्यक्त केला. लतादीदींच्या निधनाने देशात निर्माण झालेली पोकळी भरून काढता येणार नाही, असे ट्विट त्यांनी केले.  स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहताना पीएम मोदींनी आणखी एका ट्विटमध्ये लिहिले की, त्यांना लतादीदींकडून नेहमीच आपुलकी मिळाली. लता मंगेशकर यांच्या कुटुंबीयांशी फोनवरून बोलून पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लता मंगेशकर यांच्यात भावा-बहिणीसारखे नाते होते. एकदा रक्षाबंधनाच्या दिवशी लतादीदींनी पंतप्रधान मोदींकडे वचन मागितले होते की, ते भारताला नेहमी यशाच्या विकासाच्या उंचीवर नेतील.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar On Ajit Pawar Accident : अजितदादांच्या विमानाचा स्फोट झाला पण कागद का जळले नाहीत?; रोहित पवारांनी सांगितलं कारण, म्हणाले...
अजितदादांच्या विमानाचा स्फोट झाला पण कागद का जळले नाहीत?; रोहित पवारांनी सांगितलं कारण, म्हणाले...
Maharashtra Live blog updates: मुंबईच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून प्रभाकर शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब; थोड्या वेळात भरणार अर्ज
Maharashtra Live blog updates: मुंबईच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून प्रभाकर शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब; थोड्या वेळात भरणार अर्ज
Rohit Pawar: VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या लग्नाला मोठे नेते हजर; चांगले संबंध म्हणून वाचवण्याचा प्रयत्न; अजितदादांच्या विमान अपघाताबाबात बोलताना रोहित पवारांंनी सगळंच काढलं
VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या लग्नाला मोठे नेते हजर; चांगले संबंध म्हणून वाचवण्याचा प्रयत्न; अजितदादांच्या विमान अपघाताबाबात बोलताना रोहित पवारांंनी सगळंच काढलं
विमानाची माहिती नसलेली लोकं चौकशी समितीत, बेकायदेशीर नोंदणी, कागदपत्रात फेरफार, 22 दिवसांपासून चौकशीला वेग का नाही? VSR कंपनीला वाचवण्याचे काम; रोहित पवारांचा व्हिडिओतून खळबळजनक आरोप
विमानाची माहिती नसलेली लोकं चौकशी समितीत, बेकायदेशीर नोंदणी, कागदपत्रात फेरफार, 22 दिवसांपासून चौकशीला वेग का नाही? VSR कंपनीला वाचवण्याचे काम; रोहित पवारांचा व्हिडिओतून खळबळजनक आरोप

व्हिडीओ

Mulund Metro Slab  : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार
Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही
Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विमानाची माहिती नसलेली लोकं चौकशी समितीत, बेकायदेशीर नोंदणी, कागदपत्रात फेरफार, 22 दिवसांपासून चौकशीला वेग का नाही? VSR कंपनीला वाचवण्याचे काम; रोहित पवारांचा व्हिडिओतून खळबळजनक आरोप
विमानाची माहिती नसलेली लोकं चौकशी समितीत, बेकायदेशीर नोंदणी, कागदपत्रात फेरफार, 22 दिवसांपासून चौकशीला वेग का नाही? VSR कंपनीला वाचवण्याचे काम; रोहित पवारांचा व्हिडिओतून खळबळजनक आरोप
Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या विमानाचा स्फोट का झाला?; रोहित पवारांनी सांगितलं हादरवणारं कारण, पत्रकार परिषद घेऊन पुन्हा गौप्यस्फोट
अजितदादांच्या विमानाचा स्फोट का झाला?; रोहित पवारांनी सांगितलं हादरवणारं कारण, पत्रकार परिषद घेऊन पुन्हा गौप्यस्फोट
Muslim Reservation: एकीकडे 'सबका साथ, सबका विकास' म्हणायचे अन् दुसरीकडे मुस्लिमांच्या आरक्षणाच्या वाटा बंद करायच्या, मुस्लिम आरक्षण रद्द झाल्यानंतर काँग्रेसची टीका
एकीकडे 'सबका साथ, सबका विकास' म्हणायचे अन् दुसरीकडे मुस्लिमांच्या आरक्षणाच्या वाटा बंद करायच्या, मुस्लिम आरक्षण रद्द झाल्यानंतर काँग्रेसची टीका
Rahul Narvekar Land in Alibag: राहुल नार्वेकर कुटुंबीयांचं अलिबागवर विशेष प्रेम, 60 एकरपेक्षा जास्त जमिनीची खरेदी
राहुल नार्वेकर कुटुंबीयांचं अलिबागवर विशेष प्रेम, 60 एकरपेक्षा जास्त जमिनीची खरेदी
Jalgaon News : चिमुकल्याने खेळताना मुकुट समजून ॲल्युमिनियमचं भांडं डोक्यात घातलं अन् भलतंच घडलं; डॉक्टरांनी धोका पत्करून प्लंबरच्या मदतीने यशस्वी सुटका!
चिमुकल्याने खेळताना मुकुट समजून ॲल्युमिनियमचं भांडं डोक्यात घातलं अन् भलतंच घडलं; डॉक्टरांनी धोका पत्करून प्लंबरच्या मदतीने यशस्वी सुटका!
Ajit Pawar Meets Amit Shah NCP Merger: अमित शाहांकडून अजितदादांना मिळालेला हिरवा कंदील; दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत नेमकी काय चर्चा झालेली?
अमित शाहांकडून अजितदादांना मिळालेला हिरवा कंदील; दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत नेमकी काय चर्चा झालेली?
AI Impact Summit: AI समिटमध्ये PM मोदी येणार म्हणून लॉकडाऊन केला अन् चोरट्यांकडून स्टॉलवरील AI प्रॉडक्ट अवघ्या काही मिनिटात हडप! सीईओचा डोक्याला हात, आता पोलीस म्हणतात....
AI समिटमध्ये PM मोदी येणार म्हणून लॉकडाऊन केला अन् चोरट्यांकडून स्टॉलवरील AI प्रॉडक्ट अवघ्या काही मिनिटात हडप! सीईओचा डोक्याला हात, आता पोलीस म्हणतात....
Bhiwandi Mahangarpalika Election: भिवंडीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या गुप्त हालचाली, भाजप नगरसेवकांना गळाला लावण्याचा प्लॅन, महायुतीत अंतर्गत नाराजी
भिवंडीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या गुप्त हालचाली, भाजप नगरसेवकांना गळाला लावण्याचा प्लॅन, महायुतीत अंतर्गत नाराजी
Embed widget