एक्स्प्लोर
आरक्षणामुळे सधन झालेल्यांनी आता आरक्षण नाकारावं : ढोबळे
समाजातील अन्य वंचितांना आरक्षणाचा लाभ मिळेल आणि समाज समृध्द होईल, याची दक्षता त्यांनी घ्यायला हवी, असं लक्ष्मण ढोबळे म्हणाले

सोलापूर : आरक्षणाचा लाभ घेऊन स्थिर झालेल्यांनी आता आरक्षण नाकारावं, असं आवाहन माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केलं आहे. आरक्षणामुळे सधन आणि समृध्द झालेल्या नागरिकांनी भविष्यात आरक्षणाला नकार दिला पाहिजे. समाजातील अन्य वंचितांना आरक्षणाचा लाभ मिळेल आणि समाज समृध्द होईल, याची दक्षता त्यांनी घ्यायला हवी, असंही ते म्हणाले. सोलापुरात पत्रकारांशी बोलताना ढोबळेंनी आपली भूमिका मांडली. 'मी माझ्या घरापासून याची सुरुवात केली आहे. माझी मुलगी कोमल ढोबळे हिने महाविद्यालयीन शिक्षण शिष्यवृत्तीशिवाय पूर्ण केलं' असा दावाही लक्ष्मण ढोबळेंनी केला. मंत्र्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या मुलांनीच शिष्यवृत्ती घेतली तर वंचित घटकातील मुलांना कधी शिक्षणाचा लाभ मिळणार? असा सवाल ढोबळेंनी उपस्थित केला. गेल्याच आठवड्यात काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनीही असंच आवाहन केलं होतं. संबंधित बातमी आर्थिकदृष्ट्या सक्षम असताना आरक्षण मागणं ही लाचारी : सुशीलकुमार शिंदे
आणखी वाचा























