एक्स्प्लोर
बुलडाण्यातील महिला भाषेमुळे गाझियाबादच्या रुग्णालयात एकाकी
महाराष्ट्रातील 24 वर्षांची एक महिला गेल्या महिनाभरापासून दिल्लीतल्या गाझियाबाद हाॉस्पिटलमध्ये एकाकी पडून आहे. या महिलेशी संवाद साधल्यानंतर तिनं आपलं नाव वैशाली पुंडलिक मोरे असून, बुलडाण्याची रहिवाशी असल्याचं सांगितलं. पण या पलीकडे तिला तिच्या कुटुंबियांची माहिती सांगता येत नाही.
![बुलडाण्यातील महिला भाषेमुळे गाझियाबादच्या रुग्णालयात एकाकी Lady From Buldhana Suffering Language Problem In Gaziabad Hospital Latest News Updates बुलडाण्यातील महिला भाषेमुळे गाझियाबादच्या रुग्णालयात एकाकी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/18191729/delhi-mahila-from-buldhana-in-hospital.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील 24 वर्षांची एक महिला गेल्या महिनाभरापासून दिल्लीतल्या गाझियाबाद हाॉस्पिटलमध्ये एकाकी पडून आहे. “भाषेची समस्या असल्यानं आम्ही तिच्या नातेवाईकांचा काहीच थांगपत्ता लावू शकत नाही” असं हॉस्पिटल, पोलीस प्रशासनाचं म्हणणं आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला ‘वैशाली पुंडलिक मोरे’ या महिलेचा रेल्वे स्टेशनवर अपघात झाल्याचं सांगण्यात येतं आहे.
दरम्यान सुरुवातीचे काही दिवस ही महिला बेशुद्धावस्थेत होती. नंतर तिच्याकडून तिची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न हॉस्पिटलनं केला. पण ती केवळ मराठीतूनच बोलत असल्यानं समजायला कठीण गेलं. दिल्लीतल्या एका एनजीओनं स्थानिक वृत्तपत्रांत यासंदर्भातल्या बातम्या आल्यानंतर हाँस्पिटलमध्ये धाव घेतली. या महिलेशी संवाद साधल्यानंतर तिनं आपलं नाव वैशाली पुंडलिक मोरे असून, बुलडाण्याची रहिवाशी असल्याचं सांगितलं. पण या पलीकडे तिला तिच्या कुटुंबियांची माहिती सांगता येत नाही.
दिल्लीसारख्या ठिकाणी ही महिला एकटीच देवदर्शनासाठी कशी आली?, तिच्यासोबत मोबाईल किंवा इतर दुसरंच ओळखपत्र कसं नव्हतं?, असे अनेक प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झालेत. अपघातात या महिलेचे दोन्ही पाय गंभीर जखमी झाले आहेत. तिच्या पायांना प्लॅस्टर करण्यात लावण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)