"कुणी कितीही काही म्हणलं तरी राज्यातील महिलांना 1500 रुपये मिळणारच",अदिती तटकरेंनी विरोधकांना सुनावले
विरोधक काहीही अप्रचार करत असले तरी ही योजना कायमस्वरूपी चालणार असून राज्यातील कोट्यावधी जनतेला या महिन्यात हप्ता दोन हप्ते मिळणार आहेत, असे आदिती तटकरे म्हणाल्या.
मुंबई : सध्या राज्यभरात एकाच सरकारी योजनेचं नाव आहे ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना(Ladki Bahin Yojana) . सरकारने ही योजना जाहीर केल्यापासून महिलांचा या योजनेला प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळतोय तर दुसरीकडे विरोधक यावर टीका देखील करताना दिसताय. या सर्व टीकेवरून ज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विरोधकांनी सुनावले आहे. कोणी कितीही काहीही अपप्रचार केला तरीही राज्यातील कोट्यावधी महिलांना दोन हप्ते मिळणार आहेत, असे अदिती तटकरे यांनी सुनावले आहे.
कोणी कितीही काहीही अपप्रचार केला तरीही राज्यातील कोट्यावधी महिलांना दोन हप्ते मिळणार आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी राज्यातील महिलांनी महायुतीच्या पाठीमागे उभे राहावे असे आवाहन अदिती तटकरे यांनी परभणीत केले आहे . यावेळी त्यांनी योजनेला विरोध करायचा आणि सर्वाधिक फॉर्म भरून घ्यायचे असा टोलाही विरोधकांना लगावला आहे.
या महिन्यात हप्ता दोन हप्ते मिळणार : आदिती तटकरे
परभणी शहरातील राजलक्ष्मी लॉन्स येथे राष्ट्रवादी काँग्रेस कडून माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रचार आणि प्रसारासाठी महिला मेळाव्याच आयोजन करण्यात आलं होतं या महिला मेळाव्याला महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्यासह परभणी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या मेळाव्याला जिल्हा भरातून मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना अदिती तटकरे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. विरोधक काहीही अप्रचार करत असले तरी ही योजना कायमस्वरूपी चालणार असून राज्यातील कोट्यावधी जनतेला या महिन्यात हप्ता दोन हप्ते मिळणार आहेत. त्यामुळे विरोधकांनी कितीही अपप्रचार केला तरीही काही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी सांगितल आहे.
कोणत्याही गैरसमज किंवा अपप्रचाराला बळी पडू नये: आदिती तटकरे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेच्या अर्जांची छाननी शेवटच्या टप्प्यात असून 16 व 17 ऑगस्ट रोजी सर्व भगिनींच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण करण्याचा सरकारचा मानस आहे. ही प्रक्रिया कोणत्याही अडचणीशिवाय पार पडावी यासाठी तांत्रिक पातळीवर पडताळणी करणे अत्यावश्यक आहे. यासाठी आज काही महिलांच्या बँक खात्यात प्रायोगिक तत्त्वावर एक रुपया रक्कम जमा करण्यात आली. यावेळी उद्भवलेल्या काही तांत्रिक अडचणी तातडीने दुरुस्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आदिती तटकरे यांनी ट्विटरवरुन दिली. महिलांच्या बँक खात्यात पाठविण्यात आलेली 1 रुपयांची रक्कम ही केवळ एक तांत्रिक पडताळणी असून याबद्दल कोणत्याही गैरसमज किंवा अपप्रचाराला बळी पडू नये, अशी विनंती देखील आदिती तटकरे यांनी केली आहे.
हे ही वाचा :