एक्स्प्लोर

कोळशाची कमतरता, विजेविना महाराष्ट्र अंधारात जाणार? नेमकी काय आहे परिस्थिती!

विजेचा अनावश्यक वापर कमी करा, अशी विनंती महावितरणने केली आहे. देशात कोळशाची कमतरता आणि वीज संकटाच्या चर्चांवर सरकारने वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता निराधार असल्याचे म्हटले आहे.

मुंबई : देशात कोळशाची कमतरता असून याचा फटका महाराष्ट्राला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, राज्यातील सहा औष्णिक विज निर्मिती केंद्रातले प्लांट कोशळ्याअभावी बंद करण्यात आले आहेत. वीजतूट भरुन काढण्यासाठी कोयना आणि इतर 12 होयड्रो प्रकल्प पुर्ण क्षमतेने चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जर हीच परिस्थिती राहीली तर शहरी/ग्रामिण भागात आठ तासाचे लोडशेडींग करावे लागेल. त्यामुळे विजेचा अनावश्यक वापर कमी करा, अशी विनंती महावितरणने केली आहे. दरम्यान, देशात कोळशाची कमतरता आणि वीज संकटाच्या चर्चांवर सरकारने वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता निराधार असल्याचे म्हटले आहे.

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात परिस्थिती बरी
खणी कर्म संचालक पुरुषोत्तम जाधव यांच्याशी एबीपी माझानं या विषयावर संवाद साधला. त्यांनी सांगितलं की, राज्यातल्या औष्णिक विज निर्मिती केंद्राचा कोळसा पुरवठा याचे नियंत्रण त्यांच्यामार्फत होते.  जाधव यांच्या मते  इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात परिस्थिती बरी आहे. विनाकारण पॅनिक केले जात आहे. गेल्या तीन दिवसापासून पुरवठा पुन्हा सुरळीत होवू लागला आहे. कोळश्याअभावी काही प्रकल्प बंद ठेवावे लागलेत.  त्याला कोळश्याचे नियोजन म्हणतात. सध्या या नियोजनामुळे दिड हजार मेगा वॅटची तुट आहे. परंतु सध्या कोळसा पुरवठा सुरळीत होत असल्याने ती तुट भरली जाण्याची शक्यता आहे. सध्या तरी पॅनिक व्हावे अशी स्थिती नाही. केंद्रीय सचिव रोज दुपारी 4 वाजता आढावा घेत असतात. तिथे नोंदवल्या प्रमाणे पुढील 24 तासात कोळसा पुरवला जातो. या वर्षी निश्चित यापूर्वी कधी आली नव्हती अशी स्थिती झाली. स्टॅाक अतिशय कमी झाला होता.  त्याचे मुख्य कारण सप्टेबरमध्ये अचानक वीज मागणी वाढली आणि पुरवठा विस्कळीत झाला होता. सध्या शासकीय युनिटमधले उत्पादन कमी झाले आहे. पण मॅनेज होत आहे.  सणाचा काळा बघता मागणी वाढली तर लोडशेडिंग होवू शकेल. गेल्या तीन दिवसात ८० लाख ते १ लाख १० हजार टन पुरवठा होत आहे. तो दिड लाख टन हवा. तो सुरळीत झाला तर दिड हजाराची तुट कमी होईल, असं जाधव यांचं म्हणणं आहे. 

महाराष्ट्र अंधारात जाण्याची भिती! कोळश्याअभावी सहा औष्णिक विज निर्मिती केंद्रातले प्लांट बंद, होयड्रो प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवण्याचा निर्णय

केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु- प्राजक्त तनपुरे

उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलं आहे की, देशभरात निर्माण झालेल्या कोळसा टंचाईमुळे औष्णिक विद्युत केंद्रातील वीज निर्मितीवर त्याचा विपरीत परिणाम झालेला आहे. महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटले आहेत. सध्या राज्याला दोन दिवस वीज पुरवठा होऊ शकेल इतका कोळसा उपलब्ध आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या कोळशाच्या खाणीमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी ऑगस्ट महिन्यात संप केला होता, तसेच त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसाने कोळसा निर्मितीवर परिणाम झाला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोळशाची किंमत दुपटीने वाढली आहे, त्याचा एकंदरीत परिणाम औष्णिक विद्युत केंद्रांवर झाला आणि वीजपुरवठा घटला. राज्यातील कोळशाचा साठा वाढवा यासाठी आम्ही केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहोत. महाराष्ट्रात वीज पुरवठा खंडित होणार नाही यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, असं तनपुरे यांनी म्हटलं 

..तर राज्यात लोडशेडींग 
देशभरात कोशळ्या कमतरता भासत आहे. याचाच परिणाम म्हणून आज राज्यातील सहा औष्णिक विज निर्मिती केंद्रातले प्लांट बंद करण्यात आले आहे. विजेची तूट भरुन काढण्यासाठी कोयना आणि इतर 12 होयड्रो प्रकल्प हे पुर्ण क्षमतेने चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विज निर्मितीची भरपाई होईल. या प्रकल्पातून 60 टक्के तुट भरून निघणार असल्याची माहिती महावितरण कंपनीने दिली आहे. जर हीच परिस्थिती राहिली शहरी आणि ग्रामिण भागात आठ तासाचे लोडशेडींग करावे लागणार आहे. त्यामुळे विजेचा अनावश्यक वापर कमी करा, असे आवाहन महावितरणने नागरिकांना केलं आहे.


कोळशाच्या टंचाईमुळे महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील 13 संच सद्यस्थितीत बंद पडले आहेत. त्यामुळे तब्बल 3330 मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प पडला आहे. विजेची ही तूट भरून काढण्यासाठी तातडीच्या वीजखरेदीसह जलविद्युत व अन्य स्त्रोतांकडून वीजपुरवठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरु आहे. राज्यात विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न सुरु असून वीजग्राहकांनी मागणी व उपलब्धता यामध्ये समतोल राखण्यासाठी सकाळी 3 ते 10 व सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत विजेचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. 


देशभरात कोळसाटंचाई निर्माण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून औष्णिक वीजनिर्मिती कोळशाअभावी हळूहळू कमी होत आहे. त्यातच महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील 13 संच कोळशाअभावी सध्या बंद पडले आहेत. यात महानिर्मितीचे चंद्रपूर, भुसावळ व नाशिक प्रत्येकी 210 मेगावॅटचे तसेच पारस- 250 मेगावॅट आणि भुसावळ व चंद्रपूर येथील 500 मेगावॅटचा प्रत्येकी एक संच बंद झाला आहे. यासोबतच पोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडचे (गुजरात) 640 मेगावॅटचे चार संच आणि रतन इंडिया पॉवर लिमिटेडचे (अमरावती) 810 मेगावॅटचे तीन संच बंद आहेत. यामुळे महावितरणला औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमधून कराराप्रमाणे मिळणाऱ्या विजेमध्ये घट होत आहे. 

 

विजेच्या मागणी व उपलब्धता यामधील सध्या 3330 मेगावॅटची तूट भरून काढण्यासाठी खुल्या बाजारातून (पॉवर एक्सचेंज) वीज खरेदी सुरु आहे. देशभरात विजेची मागणी वाढल्यामुळे वीज खरेदीचे दर महाग होत आहे. खुल्या बाजारातून 700 मेगावॅट विजेची खरेदी 13 रुपये 60 पैसे प्रतियुनिट दराने करण्यात येत आहे. तर आज सकाळी रियल टाईम व्यवहारातून 900 मेगावॅट विजेची 6 रुपये 23 पैसे प्रतियुनिट दराने खरेदी करण्यात आली. यासोबतच कोयना धरण तसेच इतर लघु जलविद्युत निर्मिती केंद्र आणि अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांद्वारे वीज उपलब्ध करण्यात येत आहे. 


कोळसा टंचाईचे सावट गडद होत असतानाच राज्यात उष्मा वाढल्यामुळे विजेची मागणी देखील वाढली आहे. राज्यात (मुंबई वगळून) काल, शनिवारी 17,289 मेगावॅट विजेची मागणीप्रमाणे महावितरणकडून पुरवठा करण्यात आला. तर गेल्या 24 तासांमध्ये राज्याच्या काही भागात पाऊस झाल्यामुळे आज विजेच्या मागणीत घट झाली. आज, रविवारी सकाळी 11.30 वाजता राज्यात 18,200 मेगावॅट तर महावितरणच्या कार्यक्षेत्रात 15 हजार 800 मेगावॅट विजेची मागणी होती. विजेचे भारनियमन टाळण्यासाठी मा. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार कृषिवाहिन्यांवर दररोज 8 तास दिवसा किंवा रात्री चक्राकार पद्धतीने थ्री फेज वीजपुरवठा करण्यात येत आहे. 


कोळसा टंचाईमुळे विजेचा तुटवडा वाढण्याची शक्यता अधिक असल्याने मागणी व पुरवठा यात समतोल ठेवण्यासाठी वीजग्राहकांनी सकाळी 6 ते 10 आणि सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेदरम्यान विजेचा वापर अतिशय काटकसरीने करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. विजेची सर्वाधिक मागणी असणाऱ्या कालावधीत विजेचा वापर कमी झाल्यास मागणी व उपलब्धता यातील तूट कमी होईल व भारनियमन करण्याची गरज भासणार नाही.

वीज संकटाच्या बातम्या निराधार : केंद्र सरकार
देशात कोळशाची कमतरता आणि वीज संकटाच्या चर्चांवर सरकारने वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता निराधार असल्याचे म्हटले आहे. केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, त्यांनी देशातील कोळसा उत्पादन आणि पुरवठा परिस्थितीचा आढावा घेतला आहे. ते म्हणाले की, ते सर्व देशवासियांना आश्वास्त करतायेत की देशातील वीज पुरवठा खंडित होण्याचा कोणताही धोका नाही.

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?

व्हिडीओ

Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!
Special Report Manikrao Kokate माणिकराव कोकाटे संकटाच्या चक्रव्यूहात, कोकाटेंचं राजकीय भवितव्य काय?
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Embed widget