एक्स्प्लोर

Sangli Krishna River : सांगली बंधाऱ्यात कृष्णेच्या पात्राने तळ गाठला, आठ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध

सांगली, कुपवाड शहरातील अनेक भागात मागील काही दिवसापासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील नागरिकांना पाणी टंचाईला (Sangli Krishna River) सामोरे जाण्याची वेळ आली आहे. 

सांगली : वेळेत मान्सून दाखल होईल या अंदाजाने कृष्णा नदीतील सांगली (Sangli) बंधाऱ्याचे बरगे पाटबंधारे विभागाने मागील आठवड्यात काढल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. बरगे हटवल्याने बंधाऱ्यातील पाणी वाहून गेल्याने नदीतील पाण्याची पातळी कमी झाली आहे. यामुळे पावसाळ्याच्या तोंडावरच सांगली शहरात पाणीबाणी सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

मागील काही दिवसांपासून महापालिकेच्या पंपाचा उपसा कमी होत आहे. पाणी पातळी खालावल्याने महापालिकेच्या पाणी पुरवठ्याच्या पंपाला पाणी पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे सांगली, कुपवाड शहरातील अनेक भागात मागील काही दिवसापासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. 

कृष्णा नदीची पाणी पातळी खालावली 

मान्सून लांबत चालल्याने कृष्णेची पाणी पातळी खालावली आहे. नदीपात्रामध्ये आठवडाभर पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे शहरात पाणीबाणीची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. कृष्णा नदीतील सांगली बंधाऱ्याच्या फळ्या पाटबंधारे विभागाकडून काढल्या आहेत. त्यामुळे नदीची पाण्याची पातळी कमी झाली असून महापालिकेच्या पंपाचा उपसा कमी होत आहे. औद्योगिक महामंडळाच्या यांनाही पाणीपुरवठा केंद्राचे तीन स्ट्रेनरपैकी दोन स्ट्रेनर उघडे पडले आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतींना अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

सध्या कृष्णा नदीपात्रात शहराला आठ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. या काळात पाऊस न झाल्यास कोयना धरणातून पाणी सोडण्याशिवाय पर्याय नाही. पाणी पातळी खालावल्याने शहरातील नागरिकांना अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. आधीच पाणीपुरवठा बाबत नागरिकांच्या तक्रारी असताना त्यात टंचाईने डोके वर काढल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. 

वेळेत पाऊस सुरू होईल या अंदाजाने सांगलीच्या बंधाऱ्यावरील बरगे मागील आडत काढण्यात आले. मात्र मान्सून रेंगाळल्याने बंधाऱ्यातून पाणी वाहून गेल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या कृष्णा नदी पात्रातून टेंभू आणि ताकारी या सिंचन योजना साठी पाणी उपसा सुरू आहे. ताकारी योजना पुढच्या काही दिवसात बंद होईल आणि त्यानंतर कृष्णा नदीत पाणी वाढण्यास मदत होईल असं पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Embed widget