एक्स्प्लोर

Dahi Handi Celebration Live Updates : गोविंदा आला रे... दोन वर्षांनी पुन्हा ढाक्कुमाकुम! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला, दहीहंडीसंदर्भातील प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर...

Dahi Handi 2022 Live Updates : राज्यभरात दोन वर्षानंतर 'ढाक्कुमाकुम'चा सूर उमटू लागला आहे. गोविंदा पथकं थर लावण्यासाठी सज्ज झाले आहेत. दहीहंडीसंदर्भातील प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर...

LIVE

Key Events
Dahi Handi Celebration Live Updates : गोविंदा आला रे... दोन वर्षांनी पुन्हा ढाक्कुमाकुम! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला, दहीहंडीसंदर्भातील प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर...

Background

Dahi Handi Celebration Live Updates : देशभरात गोपाळकालाचा (Gopalkala) उत्साह पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात दहीहंडीचं (Dahihandi) वेगळं आकर्षण आहे. राज्यात दहीहंडीची विशेष उत्साह दिसत आहे. मुंबई, ठाण्यासह पुण्यात दहीहंडीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. विविध मंडळांकडून दहीहंडी उत्सवात लाखोंच्या बक्षीस देण्यात येतात. गोविंदा पथकं अनेक महिने मानवी मनोरे लावण्यासाठी सराव करत असतात. कोरोना संकटामुळं यंदा तब्बल दोन वर्षांनी दहीहंडी साजरी होणार आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यातील गोविंदा पथकं मनोरे रचायला सज्ज झाले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून सुरक्षेची सर्वोतोपरी काळजी घेतली आहे. 

दोन वर्षानंतर दहीहंडीचा उत्सव साजरा

दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकांनी लावलेले मानवी मनोरे पाहण्यासाठी लाखोंची गर्दी उसळते. या उत्सवाची धूम काही वेगळीच असते. रिमझिम पाऊस, उंच आकाशात बांधलेली दहीहंही, रंगीबेरंगी कपड्यांमध्ये दिसणारी गोविंदा पथकं, गाण्यावर ताल धरणारे गोविंदा, मानवी मनोरे असं सगळं चित्र फारच आल्हाददायक असतं. दहीहंडी उत्सवात ज्याप्रकारे गोविंदा पथकांनी लावलेले मानवी मनोरे बघण्यासाठी लाखोंची गर्दी उसळते, त्याचप्रमाणे या दहीहंडी उत्सवात कोणत्या आयोजकाकडे कोणते सेलिब्रिटीज बघायला मिळतील हे बघण्यासाठी देखील तितकीच गर्दी असते. त्यासाठी आधीपासूनच प्रमोशन देखीलल सुरू करण्यात येते. 

यंदा नऊ थर लावण्याचा विक्रम मोडणार?

एक,दोन तीन, चार , पाच अशा थरांचा थरार या दहीहंडी उत्सवात पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे... जास्तीत जास्त थर लावता येतील यासाठी मागील दोन महिन्यापासून मुंबईतलं नावाजलेला 'जय जवान' गोविंदा पथक या भर पावसात सुद्धा दहीहंडी साठी खास तयारी करत आहे... कारण याच गोविंदा पथकानं आतापर्यंत  सर्वाधिक 9 थर लावण्याचा विश्वविक्रम केला आहे...शिस्त, सातत्य, मेहनत या बळावर दरवर्षी गोविंदा पथक विशेष छाप पाडतय... त्यामुळे मागील दोन महिन्यापासून सुरू असलेल्या सरावात सुद्धा या पथकाने चार वेळेस नऊ थर लावले आहेत... त्यामुळे दहीहंडी उत्सवाच्या जेव्हा मैदानात उतरेल तेव्हा उत्तराचा आपलाच विश्वविक्रम मोडीत काढणार का ? याची उत्सुकता प्रत्येकाला असेल.

गोविंदा पथकं सज्ज

जय जवानच नाही तर मुंबई ठाण्यातील 200 पेक्षा अधिक गोविंदा पथक सुद्धा अशाच प्रकारे सराव करत आपला उत्साह वाढवताय.. कारण दोन वर्षांनंतर जेव्हा अशाप्रकारे थाटामाटात दहीहंडी उत्सव होतोय तेव्हा आधीपेक्षा अधिक थोर लावण्यासाठी प्रत्येक गोविंद पथक प्रयत्न करणार आहे... कारण तशा प्रकारची भरगोस बक्षीस सुद्धा आयोजकांनी ठेवल्याने त्याचे विशेष आकर्षण असणार आहे

00:00 AM (IST)  •  20 Aug 2022

Dahi Handi : रत्नागिरी जिल्ह्याला गालबोट, गोविंदाचा नाचताना मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्यातील पाज पंढरी गावातील वसंत लाया चौगले या  गोविंदाचा नाचताना  हृदयविकाराने मृत्यू  झाला. हर्णै पाज पंढरी गावात कोळी समाजातर्फे दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सकाळपासूनच दहीहंडीचा उत्साह गेला पोहोचला होता यामध्ये चौगुले सहभागी झाले होते.

18:15 PM (IST)  •  19 Aug 2022

Dahi Handi Celebration : पालघरमधील डहाणू तालुक्यातील कोळी बांधवांची पारंपरिक दहीहंडी उत्साहात

पालघर जिल्ह्यात यंदा दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळाला. दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर या वर्षी पालघरमध्ये दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यातील चिंचणी येथील कोळी वाड्यातील दहीहंडी पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली. या भागात पारंपरिक पद्धतीने लाकडी खांबावर वर्तुळाकार आकारात 101 दहीहंडी बांधण्यात येतात. हंडी बांधल्यानंतर खांबाला वंगण म्हणजेच ग्रीस लावण्यात येते. स्थानिक कोळीबांधव गोविंदा या लाकडी खांबाभोवती  वर्तुळाकार पद्धतीने एकत्र येत एकमेकांच्या खांद्यावर चढत हंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. अखेर 2 ते 3 तासांच्या प्रयत्नानंतर गोविंदांना हंडी फोडण्यात यश येते.

18:00 PM (IST)  •  19 Aug 2022

Dahi Handi Celebration : घाटकोपर येथे अंध मुलांनी दिली चार थरांची सलामी

घाटकोपर येथे आयोजित दहीहंडी कार्यक्रमात अंध मुलांनी चार थरांची सलामी दिली आहे. कला संजीवन फाउंडेशनच्या पथकांचे हे अंध गोविंदा आहेत. त्यांनी घाटकोपर येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित दहीहंडी उत्सवात ही सलामी दिली. सर्व उपस्थित गोविंदानी त्यांच्या या प्रयत्नांना टाळ्यांचा गजरात प्रतिसाद दिला आहे. नेत्रदान करा हा संदेश देत हे पथक आज मुंबईत ठिक ठिकाणी दहीहंडी थर लावत आहे.

17:27 PM (IST)  •  19 Aug 2022

 CM Eknath Shinde : आम्हीही दीड महिन्यापू्र्वी हंडी फोडली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 CM Eknath Shinde : आम्हीही दीड महिन्यापू्र्वी हंडी फोडली. कठीण असतानाही 50 थर लावले. ठाण्यातील टेंभीनाकाच्या दंहीहंडीत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्याच्या सत्तांतरावर मिश्किल भाष्य केलं. यावेळी उपस्थितांंमध्ये एकच हाशा पिकला. 

[yt]https://www.youtube.com/watch?v=zyQRjx7AF1Y[/yt]

15:15 PM (IST)  •  19 Aug 2022

मुंबईमध्ये दहीहंडीची धूम

संपूर्ण मुंबईमध्ये आज दहीहंडीची धूम सुरू आहे. घाटकोपरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या राखी जाधव यांच्या वतीने भव्य दहीहंडीचे आयोजन केले आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि इतर नेते मंडळी उपस्थित रहाणार आहेत, तर या ठिकाणी प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम उपस्थित झाले आहेत. त्यांनी विविध गाण्यांवर ठेका धरत या ठिकाणी डान्स ही केला आहे. यावेळी त्यांनी ज्या पद्धतीने आज दोन वर्षानंतर हा जल्लोष हंडीत दिसतो आहे. तो चित्रपट थिएटरमध्ये ही दिसावा अशी आशा व्यक्त केली आहे. तर राखी जाधव यांनी पथकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आभार मानले आहेत.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget