एक्स्प्लोर
कोपर्डी निकाल : मला फाशी नको, जन्मठेप द्या: जितेंद्र शिंदे
शिक्षेच्या युक्तीवादाच्या पार्श्वभूमीवर आजही अहमदनगर जिल्हा न्यायालयात कडक बंदोबस्त तैनात आला आहे.
अहमदनगर : राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणी, तीनही दोषींच्या शिक्षेचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे. दोषींना शिक्षेवर आज जिल्हा सत्र न्यायालयात युक्तीवाद झाला. दोषीच्या वकिलांनी आज आपल्या अशिलाला कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी केली.
या प्रकरणातील मुख्य दोषी आरोपी असलेल्या जितेंद्र शिंदेंने पीडित तरुणीला आपण मारलं नाही, असा दावा करत, फाशी ऐवजी जन्मठेप देण्याची मागणी केली. तर शिंदेचे वकील मोहन मकासरे यांनी आपल्या अशिलाला फाशी नको तर जन्मठेप द्यावी, अशी मागणी केली.
दुसरीकडे या खटल्यातील तीन नंबरचा आरोपी नितीन भैलुमेच्या वकिलांनी आपल्या अशिलाला या खटल्यात गोवल्याचा दावा केला. तसंच नितीन भैलुमे हा कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नाही. तो दलित कुटुंबातील आहे. तो 26 वर्षाचा विद्यार्थी असून, त्याचं कुटुंब सर्वसामान्य आहे. त्याचे पालक त्याच्यावर अवलंबून आहेत. शिवाय त्याच्यावर लावण्यात आलेल्या कलमात जास्त शिक्षेची तरतूद नाही. तो केवळ 102 ब कटकारस्थान आणि 109 गुन्ह्याला उत्तेजित करणं या दोनच कलमात दोषी आढळला आहे. त्याच्याविरोधात कोणताही साक्षीदार नाही, कोणी प्रत्यक्षदर्शी नाही, त्याला या गुन्ह्यात गोवण्यात आलं आहे. तो एक सुशिक्षीत मुलगा आहे, असा दावा नितीन भैलुमेचे वकील प्रकाश अहेर यांनी केला.
LIVE UPDATE
आरोपी नंबर तीन- नितीन भैलुमे -कोपर्डी खटल्यात आरोपी नितीन भैलूमेचे वकील प्रकाश आहेर यांचा युक्तिवाद पूर्ण -आरोपीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. - तो 26 वर्षाचा विद्यार्थी असून त्याचं कुटुंब सर्वसामान्य आहे. त्याचे पालक त्याच्यावर अवलंबून आहेl. - या संदर्भात आरोपी नितीन भैलुमेला न्यायालयानं तुला काही सांगायचं का असं विचारल्यावर हात जोडून त्यानं मी निर्दोष असल्याचं सांगितलं. – नितीन भैलुमेविरोधात कोणताही साक्षी पुरावा नाही, त्याला गुन्ह्यात अडकवलंय, तो बलात्कार, हत्या प्रकरणात नव्हता- दोषीचे वकील आरोपी नंबर एक - जितेंद्र शिंदे जितेंद्र शिंदेच्या वकिलांचाही युक्तिवाद पूर्ण. मोहन मकासरे यांनी युक्तिवाद केला. कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी मी तिला मारलं नाही, मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेचा कोर्टात दावा, फाशी ऐवजी जन्मठेप देण्याची मागणीउज्ज्वल निकम उद्या युक्तीवाद करणार
बचावपक्षाचे वकील आज दोषींना कमीत कमी शिक्षेची मागणी करतील. त्यानंतर उद्या (22 नोव्हेंबर) विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आपली बाजू मांडतील. वकील उज्ज्वल निकम यांनी कठोरातील कठोर शिक्षेची मागणी केली आहे.
दरम्यान, बलात्कार आणि हत्येप्रकरणी मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलूमे या तिघांवर कटकारस्थान करुन अत्याचार आणि हत्येचा दोष सिद्ध झाला आहे. त्यामुळे या तीनही नराधमांना फाशी की जन्मठेप याचा फैसला आता 22 नोव्हेंबरला होणार आहे. शिक्षेच्या युक्तीवादाच्या पार्श्वभूमीवर आजही अहमदनगर जिल्हा न्यायालयात कडक बंदोबस्त तैनात आला आहे. जन्मठेप की फाशी? दरम्यान, आरोपींवर ज्या कलमांतर्गत दोष सिद्ध झाले आहेत, त्यानुसार त्यांना कमीत कमी जन्मठेप आणि जास्तीत जास्त फाशीची शिक्षा होऊ शकते. कलम 120 ए, 376 (बलात्कार) आणि 302 (हत्या) अशा कलमांन्वये लावलेले आरोप सिद्ध झाले आहेत. कोर्टात नेमकं काय झालं? कोर्टात आज तीनही आरोपींवरील दोष सिद्ध झाले. सुरुवातीला न्यायाधीशांनी आरोपींना कठड्यात उभं केलं. तीनही आरोपींना नाव विचारुन, त्यांचं वय विचारलं. मग न्यायालयाने तिघांवर ठेवण्यात आलेले आरोप त्यांना वाचून दाखवले. तिघांवर बलात्कार, कटकारस्थान आणि हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यानंतर तिघांवरील दोष सिद्ध करण्यात आले. काय आहे नेमकं प्रकरण? अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डीमध्ये 13 जुलै 2016 रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन निर्घृण तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाने राज्य ढवळून निघालं होतं. या प्रकरणी पोलिसांनी नितीन भैलुमे, जितेंद्र शिंदे आणि संतोष भवाळ या तिघांना अटक करण्यात आली होती. जलदगती न्यायालयात सुनावणी करुन आरोपींना फाशी देण्याची मागणी करण्यात आली. 31 जणांच्या साक्ष कोपर्डी खटल्यात आतापर्यंत 31 जणांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात सर्व साक्षीदारांच्या साक्षी पूर्ण झाल्या आहेत. याप्रकरणी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांच्यावर कटकारस्थान करुन बलात्कार आणि हत्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. संबंधित बातम्या खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोणीही नव्हता, तरीही जिंकलो : निकम कोपर्डी निकाल: आरोपींना जास्तीत जास्त काय शिक्षा होऊ शकते? कोपर्डी बलात्कार-हत्या: तीनही आरोपी दोषी, 22 तारखेला शिक्षा कोपर्डी निकाल: दोषींना कठड्यात उभं करुन न्यायाधीशांनी विचारलं….अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
शिक्षण
महाराष्ट्र
Advertisement