एक्स्प्लोर

कोपर्डीचा निकाल 29 नोव्हेंबरला, तीनही आरोपींना फाशीच हवी: उज्ज्वल निकम

ज्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला, त्या कोपर्डी खटल्यातील दोषींच्या शिक्षेची आज सुनावणी झाली. या खटल्याचा निकाल 29 नोव्हेंबरला लागणार आहे.

अहमदनगर : ज्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला, त्या कोपर्डी खटल्यातील दोषींच्या शिक्षेची सुनावणी आज पूर्ण झाली. या खटल्याचा निकाल आता येत्या 29 नोव्हेंबरला लागणार आहे. महाराष्ट्राबरोबरच देशाचंही या खटल्याकडे लक्ष लागलं आहे. त्यामुळे दोषींना जन्मठेप की फाशी हे 29 नोव्हेंबर 2017 रोजी समजणार आहे. अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात काल आरोपी नंबर 1 जितेंद्र शिंदे आणि आरोपी नंबर 3 नितन भैलुमे यांच्या शिक्षेवर युक्तीवाद झाला होता. त्यामुळे आज या खटल्यातील दुसरा दोषी संतोष भवाळ, याचे वकील बाळासाहेब खोपडे यांनी सुरुवातीला शिक्षेवर युक्तीवाद केला. घटना दुर्देवी आहे, मात्र प्रत्येकाला बचावाचा, अधिकार आहे. त्यामुळे शिक्षेच्या सुनावणीवर कोणतासाही सामाजित दबाव नसावा, असा युक्तीवाद दोषीच्या वकिलांनी केला. त्यानंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी युक्तीवाद केला.  तीनही आरोपी प्रौढ आहेत, त्यांनी जाणीवपूर्वक हे कृत्य केलं आहे. त्यांना कमी शिक्षा दिली तर ते पुन्हा असं कृत्य करणार नाहीत याची खात्री नाही. त्यामुळे न्यायलयाने तीनही आरोपींना फाशीच द्यावी, असं उज्ज्वल निकम म्हणाले.

दोन्ही वकिलांच्या या युक्तीवादानंतर न्यायालायने या खटल्याचा निकाल 29 नोव्हेंबरपर्यंत राखून ठेवला.

उज्ज्वल निकम यांचा युक्तीवाद

-11  जुलैला आरोपींनी पीडितेला अडवलं. आरोपी जितेंद्र शिंदेनं हात ओढून अत्याचारासाठी चारीकडे खेचलं. यावेळी मैत्रीण रडली. यावेळी आरोपी भवाळ आणि नितीन भैलुमे हसत होते.

-निशस्त्र मुलीला हसून ओढतात. त्यामुळं शिंदेच्या कृतीचा भवाळ आणि नितीन भैलूमे आनंद घेत होते.

-नागरिक येण्याच्या भितीनं दोघांनी आपलं काम तीला नंतर दाखवू, असं  शिंदेला  म्हटलं.  म्हणजेच आपण दोघे नंतर अत्याचार करु हा अर्थ होतो.

- त्यानंतर पीडित तरुणी दोन दिवसांनी 13 जुलैला सायंकाळी आजोबाकडे दुचाकीवरुन जात होती. यावेळी आरोपी दुचाकीवरुन लक्ष ठेवत होते.

- घराबाहेर गेलेली मुलगी घरी लवकर  न आल्यानं आई पहायला निघाली. त्यावेळी पीडीत विवस्त्र पडली होती आणि त्यावेळी शिंदे पळून गेला. यापूर्वी भवाळ आणि नितीन भैलूमे यांनी आरोपी शिंदेला पळून जाण्यासाठी दुचाकी तयार ठेवली होती.

- तीन आरोपी मनोरुग्ण नव्हते. तीन आरोपी  प्रौढ होते त्यांना कृत्याची जाणीव होती. त्यामुळं आरोपींना कमी शिक्षा दिल्यास समाजात तो पुन्हा असं करणार नाही याची खात्री नाही. -त्यामुळं दोषी ठरवल्यामुळे त्यांना पश्चाताप आणि दुःख नाही, आरोपी जितेंद्र शिंदे कमी शिक्षेची मागणी केली नाही. त्यामुळं जन्मठेपने सुधारणार नाही. शिंदेनं शिक्षा एक दिवस काय आणि हजार दिवस काय असं म्हटलंय. -त्याचबरोबर भवाळ आणि नितीन भैलूमे यांना पश्चाताप नाही. कमी शिक्षा दिल्यास सुधारणा होईल का हा प्रश्न आहे. - 13 जुलैला घटनेवेळी आरोपी शिंदेनं दोघांना भवाळ आणि नितीन भैलूमे यांना मोबाईल फोनवर मिस्ड कॉल केला होता. यावेळी भवाळ आणि नितीन भैलूमे नं उत्तर दिले नाही. - 13 तारखेला आरोपी सात वाजता चकरा मारत होते तर त्यानंतर आत्याचार झाला आणि नंतर मिस्ड कॉल केलाय. आरोपी शिंदेचं माळ घटनास्थळी सापडली. -यांचं भविष्यात पुनर्वसन होण्याची शक्यता कमी आहे. तीनही आरोपींनी क्रूरपणे आत्याचार आणि हत्या केली. ही विकृती आहे. त्यामुळं जितेंद्र शिंदेला फाशी शिक्षा देण्याची मागणी -तर संतोष भवाळ आणि नितीन भैलूमे यांना बलात्कार करण्याची इच्छा होती. त्यामुळं दोघांनी कटकारस्थान करुन अत्याचार आणि हत्या केली. त्यामुळं या दोघांना फाशीची मागणी - तिघांना आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची उज्ज्वल निकम यांची मागणी केली बाळासाहेब खोपडे यांचा युक्तीवाद 
  • घटना दुर्देवी आहे, मात्र प्रत्येकाला बचावाचा, अधिकार आहे. त्यामुळे शिक्षेच्या सुनावणीवर कोणतासाही सामाजित दबाव नसावा.
  • संतोष भवाळनं गुन्हा केलेला नाही, तरीही पुरावा आणून आरोपी दोषी ठरवला गेला.
  • शिवाय घटनेवेळी २ आणि ३ क्रमांकाच्या आरोपीला कुणीही घटनास्थळावरुन पळून जाताना पाहिलेलं नाही, म्हणून संतोष भवाळवर ३०२ कलमाची शिक्षा लागू होत नाही
  • या प्रकरणी रेअरेस्ट ऑफ रेअर असं यात काय घडलं? दिसला फिरला म्हणून कट करुन हत्या असं होत नाही. शिक्षा दिली तर समाजात ऐकोपा होईल का, तसं असेल तर मी फाशी मागेन. फाशी साठी पुरावा नाही.
मला फाशी नको, जन्मठेप द्या: जितेंद्र शिंदे कोपर्डी बलात्कार प्रकरणातील दोषींना कमीत कमी शिक्षा व्हावी, अशी मागणी बचाव पक्षांच्या वकिलाने काल केली. या प्रकरणातील मुख्य दोषी जितेंद्र शिंदेंने पीडित तरुणीला आपण मारलं नाही, असा दावा करत, फाशीऐवजी जन्मठेप देण्याची मागणी केली. तर शिंदेचे वकील योहान मकासरे यांनी आपल्या अशिलाला फाशी नको तर जन्मठेप द्यावी, अशी मागणी केली. नितीन भैलुमेच्या वकिलांचा युक्तीवाद दुसरीकडे  या खटल्यातील तीन नंबरचा आरोपी नितीन भैलुमेच्या वकिलांनी आपल्या अशिलाला या खटल्यात गोवल्याचा दावा केला. तसंच नितीन भैलुमे हा कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नाही. तो दलित कुटुंबातील आहे. तो 26 वर्षाचा विद्यार्थी असून, त्याचं कुटुंब सर्वसामान्य आहे. त्याचे पालक त्याच्यावर अवलंबून आहेत. शिवाय त्याच्यावर लावण्यात आलेल्या कलमात जास्त शिक्षेची तरतूद नाही. तो केवळ 102 ब कटकारस्थान आणि 109 गुन्ह्याला उत्तेजित करणं या दोनच कलमात दोषी आढळला आहे. त्याच्याविरोधात कोणताही साक्षीदार नाही, कोणी प्रत्यक्षदर्शी नाही, त्याला या गुन्ह्यात गोवण्यात आलं आहे. तो एक सुशिक्षित मुलगा आहे, असा दावा नितीन भैलुमेचे वकील प्रकाश अहेर यांनी केला. तीनही आरोपी दोषी दरम्यान, बलात्कार आणि हत्येप्रकरणी मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलूमे या तिघांवर कटकारस्थान करुन अत्याचार आणि हत्येचा दोष सिद्ध झाला आहे. कलम 120 ए, 376 (बलात्कारा) आणि 302 (हत्या) अशा कलमांन्वये लावलेले आरोप सिद्ध झाले आहेत. त्यामुळे या तीनही नराधमांना फाशी की जन्मठेप याचा फैसला आता 29 नोव्हेंबरला होणार आहे. शिक्षेच्या युक्तीवादाच्या पार्श्वभूमीवर आजही अहमदनगर जिल्हा न्यायालयात कडक बंदोबस्त तैनात आला. काय आहे नेमकं प्रकरण? अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डीमध्ये 13 जुलै 2016 रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन निर्घृण तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाने राज्य ढवळून निघालं होतं. या प्रकरणी पोलिसांनी नितीन भैलुमे, जितेंद्र शिंदे आणि संतोष भवाळ या तिघांना अटक करण्यात आली होती. जलदगती न्यायालयात सुनावणी करुन आरोपींना फाशी देण्याची मागणी करण्यात आली. 31 जणांच्या साक्ष कोपर्डी खटल्यात आतापर्यंत 31 जणांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात सर्व साक्षीदारांच्या साक्षी पूर्ण झाल्या आहेत. याप्रकरणी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांच्यावर कटकारस्थान करुन बलात्कार आणि हत्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. कोपर्डी बलात्कार आणि हत्येचा घटनाक्रम… 13 जुलै 2016 – रोजी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान पीडितेवर अमानुष अत्याचार करुन हत्या 15 जुलै 2016 –  जितेंद्र शिंदेला श्रीगोंद्यात अटक 16 जुलै 2016 – संतोष भवाळला अटक 17 जुलै 2016 – तिसरा आरोपी नितीन भैलुमे अटकेत 18 जुलै 2016 – दोन आरोपींवर जिल्हा न्यायालय परिसरात हल्ला 24 जुलै 2016 – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोपर्डीला भेट 7 ऑक्टोबर 2016 –  तिन्ही आरोपींविरोधात जिल्हा न्यालयात दोषारोपपत्र दाखल 1 एप्रिल 2017 –  कोपर्डी खटल्यातील तिन्ही आरोपींवर शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जिल्हा न्यायालयाच्या आवारात हल्ला 22 जून 2017 –  खटल्यात सरकारी पक्षाने एकूण 31 साक्षीदार तपासले 2 जुलै 2017 – कोपर्डीत सूर्योदय संस्थेच्यावतीने निर्भयाचं स्मारक बांधण्याच निर्णय 12 जुलै 2017 – कोपर्डी घटनेच्या एक वर्षाच्या पूर्वसंध्येला नगरला कॅण्डल मार्च 13 जुलै 2017 – घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्याने निर्भयाला श्रद्धांजली अर्पण 9 ऑक्टोबर – खटल्याचा अंतिम युक्तिवाद पूर्ण 18 नोव्हेंबर 2017 तीनही आरोपी दोषी 21 नोव्हेंबर 2017 दोषी नंबर 1 जितेंद्र शिंदे आणि दोषी नंबर 3 नितीन भैलुमे यांच्या वकिलांचा शिक्षेवर युक्तीवाद, कमीत कमी शिक्षेची मागणी 22 नोव्हेंबर 2017 दोषी नंबर 2 - संतोष भवाळच्या वकिलांचा युक्तीवाद, घटना दुर्देवी आहे, मात्र प्रत्येकाला बचावाचा, अधिकार आहे. त्यामुळे शिक्षेच्या सुनावणीवर कोणताही सामाजित दबाव नसावा, असा युक्तीवाद दोषीच्या वकिलांनी केला. त्यानंतर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तीनही आरोपी प्रौढ आहेत, त्यामुळे त्यांना फाशीच द्यावी, अशी मागणी केली. संबंधित बातम्या कोपर्डी प्रकरण : दोषींच्या वकिलांचा कोर्टातील युक्तीवाद जसाच्या तसा कोपर्डी निकाल : मला फाशी नको, जन्मठेप द्या: जितेंद्र शिंदे खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोणीही नव्हता, तरीही जिंकलो : निकम कोपर्डी निकाल: आरोपींना जास्तीत जास्त काय शिक्षा होऊ शकते? कोपर्डी बलात्कार-हत्या: तीनही आरोपी दोषी, 22 तारखेला शिक्षा कोपर्डी निकाल: दोषींना कठड्यात उभं करुन न्यायाधीशांनी विचारलं….
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी

व्हिडीओ

Ganesh Naik Special Report : गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द
Thackeray Brothers : ठाकरेंची पिछाडी का? लोकांपर्यंत पोहोचायला ठाकरे कुठे कमी पडले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
Embed widget