एक्स्प्लोर
कोपर्डी बलात्कारातील आरोपीचा राम शिंदेंसोबत फोटो, राष्ट्रवादीचा दावा

अहमदनगर : कोपर्डीतील बलात्कार प्रकरणातील आरोपी संतोष भवाळच्या फेसबुक अकाऊंटवर पालकमंत्री राम शिंदेत फोटो आहे, असा दावा राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. त्यामुळे स्वतःच्या मतदारसंघात घडलेल्या या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारुन राम शिंदे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. संतोष भवाळ असं या आरोपीचं नाव सांगितलं जातं असलं, तरी या फोटोची पुष्टी मात्र एबीपी माझानं केलेली नाही. धनंजय मुंडेंनी याबाबतचा दावा केला आहे. त्याशिवाय काही वृत्तपत्रांच्या वेबसाईटवरही हा फोटो झळकतो आहे. त्यामुळे एकंदरीत या प्रकरणी राम शिंदेंभोवतीच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. राम शिंदेंचं स्पष्टीकरण "भवाळ या व्यक्तीला ओळखत नाही. काल कोपर्डीला भेट दिल्यानंतर आरोपीला अटक झाली आहे. घटनेकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी या घटनेकडे गांभिर्याने पाहत आहे. आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. नराधमांना कठोर शिक्षा करण्यासाठी मी स्वत: आग्रही राहीन. तपासावार कोणताही दबाव येणार नाही. नि:पक्षपातीपणेच तपास होईल", असे राम शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.
संबंधित बातम्या:
कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणातील आरोपींच्या अंगावर अंडीफेक
नगरमध्ये बलात्कार आणि हत्या, हजारो ग्रामस्थ रस्त्यावर
आणखी वाचा























