एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तुरुंगातून 40 वर्षांनी सुटलेल्या वडिलांची गळाभेट, मुलाला हार्ट अटॅक
कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात हत्येच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या वडिलांची चाळीस वर्षांनी सुटका झाली. सुटका झालेल्या पित्याची लेकाने आनंदाच्या भरात गळाभेट घेतली, मात्र तोच क्षण मुलाच्या आयुष्यातला अखेरचा ठरला. हार्ट अटॅकने मुलगा साजिद हासम मकवाना यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
हासम मोहम्मद मकवाना हा मुंबईतील एका हत्येच्या गुन्ह्याखाली पुणे येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. 2015 पासून तो कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात होता. गेली चाळीस वर्ष तो शिक्षा भोगत असल्याने मंगळवारी त्याची जन्मठेपेची शिक्षेची मुदत संपली होती. त्यामुळे त्याला घरी घेऊन जाण्यासाठी त्याचा मुलगा साजिद आणि पत्नी दोघे जण आले.
कारागृह प्रशासनाची कागदपत्रे पूर्ण झाल्यानंतर काल दुपारच्या सुमारास ते तिघेजण बाहेर पडले. वडिलांना पाहून साजिदचे डोळे भरुन आले. वडिलांसोबत गळाभेट घेतल्यानंतर अचानक साजिदला अस्वस्थ वाटू लागलं. त्याला रिक्षाने खासगी रुग्णालयात दाखल केलं असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. डोळ्यासमोर मुलाचा मृत्यू झाल्याचं पाहून आई-वडिलांनी फोडलेला टाहो हृदय पिळवटून टाकणारा होता.
साजिद याचे मुंबईतल्या अंधेरीत मोटार ड्रायव्हिंग स्कूल आहे. चाळीस वर्षांनी पत्नी आणि मुलाच्या सहवासात रममाण होण्यापूर्वीच मुलाच्या आकस्मित मृत्यूमुळे हासम मकवाना यांना मानसिक धक्का बसला आहे. सीपीआरमध्ये शवविच्छेदन करुन तात्काळ मृतदेह घेऊन ते मुंबईला रवाना झाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement