एक्स्प्लोर
कोल्हापुरात नायलॉन धाग्यात अडकून तडफडणाऱ्या सापाची सुटका

कोल्हापूर : कोल्हापूरच्या रंकाळा बागेतील तलावात तडफडणाऱ्या सापाला धनंजय नामजोशी या सर्पमित्रानं जीवदान दिलं आहे. तरुणाने सापाची नायलॉनच्या धाग्यांतून यशस्वी सुटका केली आहे. नायलॉनच्या दोरीत अडकलेला बेडूक आणि मासा या सापानं खाल्ला होता. तसेच नायलॉनची दोरी या सापाच्या तोंडात अतिशय वाईट पद्धतीने अडकली होती. मात्र धनंजय नामजोशींनी ही दोरी पद्धतशीरपणे काढून सापाला जीवदान दिलं. कोल्हापूरच्या रंकाळा तलावात फिरण्यासाठी गेलेल्या धनंजय यांच्या एका मित्राच्या हा प्रकार लक्षात आला. याबाबत धनंजय यांना माहिती देताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सापावर उपचार केले. साधारणतः 10 ते 15 मिनिटं चाललेल्या या प्रकारामुळे रंकाळा तलावात बघ्यांची एकच गर्दी जमली होती. सापाची नायलॉनच्या धाग्यांतून यशस्वी सुटका झाल्यानंतर त्यांनी धनंजय यांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं.
आणखी वाचा























