एक्स्प्लोर

ऐकावं ते नवलच! 'तो' न्यायाधीशांचे वाळत घातलेले कपडे चोरायचा; अखेर सापळा रचला आणि...

कोल्हापुरात (Kolhapur Latest Update) एक असा चोर सापडला आहे जो धुतलेले आणि वाळत घातलेले कपडे चोरायचा. ते ही चक्क न्यायाधीशांचे..

कोल्हापूर : चोरीचे वेगवेगळे प्रकार आपण पाहत असतो. काही चोर लाखोंची चोरी करतात, कुणी घरं फोडतात, कुणी सोनं लंपास करतात तर कुणी अजून काही. मात्र कोल्हापुरात (Kolhapur Latest Update) एक असा चोर सापडला आहे जो धुतलेले आणि वाळत घातलेले कपडे चोरायचा. ते ही चक्क न्यायाधीशांचे.. धुतलेले कपडे कोणी तरी सतत चोरुन नेत असल्याने न्यायाधीश वैतागले होते. अखेर कर्मचाऱ्यांच्या मदतीने सापळा रचण्यात आला. सोमवारी पहाटे चोरटा आला आणि दोरीवर वाळत घातलेले कपडे घेऊन पळून जात असताना न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर झडप घालून पकडले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली. 

सदर आरोपीला कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिल्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात भुदरगड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या गारगोटी येथे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालय आहे. न्यायालयाच्या आवारातील न्यायाधीशांच्या निवासस्थानात ते कुटुंबासह राहतात.

निवासस्थानाच्या बाहेर धुवून वाळत घातलेले कपडे कोणी तरी चोरुन नेत होते. कपडे चोरीच्या वारंवार घटना घडू लागल्याने न्यायाधीश वैतागले. त्यानंतर न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी चोरीचा छडा लावण्यासाठी निवासस्थानाच्या आसपास पहारा सुरू केला.

सोमवारी पहाटे न्यायालयाकडील बाजूने एक व्यक्ती निवासस्थानाच्या परिसरात आली. त्याने थेट न्यायाधीशांच्या घराबाहेर दोरीवरील वाळलेले कपडे घेऊन पळ काढला. कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग करुन कपड्यासह पकडले आणि भुदरगड पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, सुशांत चव्हाण असं चोरट्याचं नाव असून पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवून अटक केली. त्याला कोर्टापुढे हजर केले असता चोरट्याला तीन दिवसाच्या कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

 

महत्त्वाच्या बातम्या : 

 

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Pankaja Munde : मंत्री पंकजा मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य; म्हणाल्या, 'जसा समृद्धी हायवेवर एक्झिट असतो तसाच....
'जसा समृद्धी हायवेवर एक्झिट असतो तसा माझ्या राजकारणातही वेळोवेळी एक्झिट असेल'; मंत्री पंकजा मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य
Abhijeet Dipke : अमित शाह असताना जर परदेशातून फंडिंग होत असेल तर हे कसले चाणक्य? अभिजीत दिपकेंचा टोला
अमित शाह असताना जर परदेशातून फंडिंग होत असेल तर हे कसले चाणक्य? अभिजीत दिपकेंचा टोला

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Embed widget