एक्स्प्लोर
ताराराणी भाजप आघाडीच्या नगरसेवकाला दगडाने ठेचण्याचा प्रयत्न
कोल्हापूर : महापालिका निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसं राज्यात वातावरण चांगलंच तापायला लागलं आहे. मात्र या 'काँटे की टक्कर'मध्ये एकमेकांचे काटे काढण्यापर्यंत मजल गेली आहे. कोल्हापुरात ताराराणी भाजप आघाडीचे नगरसेवक राजसिंह शेळके यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.
कोल्हापूरच्या मार्केट यार्ड परिसरातील नगरसेवक राजसिंह शेळके याना दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. हल्ल्यात शेळके गंभीर जखमी झाले आहेत. कुख्यात गुंड स्वप्नील तहसीलदारचा भाऊ सागर तहसीलदार यांच्यासह सहा जणांनी केली मारहाण केल्याचा आरोप आहे.
बुधवारी मध्यरात्री सागर आणि त्याचे सहकारी शेळके यांच्या घराजवळ गेले होते. शेळकेंना घराबाहेर बोलावून या प्रभागात काम जास्त करायला लागला आहात, अशा शब्दात शेळकेंशी त्यांनी अरेरावी केली. सागरने शेजारी पडलेला दगड शेळकेंच्या तोंडावर मारण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत शेळके खाली पडले.
त्याचवेळी सागरच्या इतर सहकाऱ्यांनीही शेळकेंना मारहाण केली. सागरने दुसऱ्यांदा दगड उचलून शेळकेंच्या तोंडावर मारला. या हल्ल्यात राजसिंह शेळके गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
प्रभागातील प्रतिष्ठेच्या मुद्द्यावरुन आणि शेळकेंच्या जनसंपर्कावरुन त्यांना मारहाण झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी सागर तहसीलदारसह सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement