एक्स्प्लोर
कोकणातल्या रानफुलांची थक्क करणारी कहाणी!
सावंतवाडी, सिंधुदुर्ग: उन्हाळ्यात कोकणातल्या रानावनाला सुगंधी करणारी फुलं बहरतात. ही फुलं तोडण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.. याच सुरंगी फुलांवर ‘माझा’चा विशेष रिपोर्ट
सुरंगी... तिच्या नावातच सुगंध दरवळतो. कोकणातल्या रानावनाला सुगंधी करणारी ही फुलं उन्हाळा आला की आणखी बहरतात. कोकणात कुठेही फेरफटका मारा, रस्त्याकडेला ही अद्भुत फुलांच्या माळा घेऊन उभ्या पोरी हमखास दिसतात. पण या माळा केसात माळण्यापर्यंतचा प्रवास प्रचंड कठीण आहे.
भल्या पहाटे 5 वाजता... पहाटेच्या मंद प्रकाशात गावातल्या मुली घनदाट जंगलात जातात. सुरंगी असतेच इतकी सुगंधी की तिचा घमघमाट अख्ख्या जंगलाला सुगंधी करतो. तुमच्या-आमच्या घरातल्या कुंडीत लावलेल्या गुलाबा इतकं सुरंगीची फुलं तोडणं सोपं नसतं.
मुळात ही फुलं एका अजस्त्र झाडावर उगवतात. त्या झाडावर या मुली चढाई करतात आणि झाडाच्या टोकावर जाऊन फुलांचा शोध सुरु होतो.
मोठ्या मोठ्या फांद्यांवर या कळ्या उगवतात. त्या तोडून आपल्या झोळीत टाकायच्या. अशा किमान तासभर परिश्रमानंतर हा गावरान अत्तराचा सुगंध घेऊन मुली परतीच्या प्रवासाला लागतात.
पण काम इथं संपत नाही. कारण घरी गेल्यानंतर या नाजूक कळ्यांचा गजरा विणण्याचं महाकठीण काम करावं लागतं. बरं फुलं इतकी नाजूक की त्यांचा गजरा करताना त्यांना तळहाताच्या फोडासारखं जपावं लागतं.
गजरा माळला की तो हायवेवर जाऊन विकणे आणि त्यातून पैसे मिळवणे हाच यांचा नित्यक्रम. पण गजरा वेळेत विकला नाही तर काही तासात तो कोमेजतोही.
निसर्गात रमणारा कोकणी माणूस त्याच निसर्गावर अवलंबून आहे. जितकं खडतर कोकण तितकंच खडतर इथलं जगणं. पण गजऱ्यातल्या फुलांप्रमाणे दुसऱ्यांना आनंद देणारं!
VIDEO:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बीड
क्राईम
बातम्या
Advertisement