![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकरांवर चाकूहल्ला, घड्याळाने वाचवलं
हल्लाखोर अजिंक्य टेकाळे पाडोळी गावचा रहिवासी आहे. हल्ला करुन अजिंक्य घटनास्थळावरुन पसार झाला, असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
![शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकरांवर चाकूहल्ला, घड्याळाने वाचवलं Knife attack on Shiv Sena MP Omraje Nimbalkar in OSMANABAD शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकरांवर चाकूहल्ला, घड्याळाने वाचवलं](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/10/16064909/Omraje-Attack.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
उस्मानाबाद : शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर प्रचार सभेत तरुणाने चाकू हल्ला केला आहे. कळंब तालुक्यातील नायगाव पाडोळी येथे ही घटना घडली आहे. या तरुणाने निंबाळकर यांच्यावर हल्ला का केला, याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
नायगाव पाडोळी येथील प्रचार सभा संपवून निंबाळकर निघत होते. त्यावेळी उपस्थितांनी त्यांच्याभोवती मोठी गर्दी केली होती. या गर्दीतूनच हल्लोखोर अजिंक्य टेकाळे पुढे आला आणि त्याने निंबाळकर यांना हात मिळवत त्यांच्यावर हल्ला केला. अजिंक्यने केलेला हल्ला ओमराजे निंबाळकर यांच्या डाव्या हातावरील घड्याळावर बसला. सुदैवाने निंबाळकर गंभीर जखमी नाहीत.
हल्लाखोर अजिंक्य टेकाळे पाडोळी गावचा रहिवासी आहे. हल्ला करुन अजिंक्य घटनास्थळावरुन पसार झाला, असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ओमराजे यांना घटनेचा धक्का बसला असला तरी त्यांचे नियोजित दौरे सुरुच राहणार आहेत.
जनतेच्या आशीर्वादाने मी सुखरुप : ओमराजे निंबाळकर
गेल्या काही दिवसांपासून काही जण माझ्या प्रचार सभेत विनाकारण गोंधळ घालत होते. मला टार्गेट केलं जात आहे. या तरुणाने हल्ला का केला, याची मला माहिती नाही. मात्र एखाद्यावर जीवघेणा हल्ला होणे हे दुर्दैवी आहे. जनतेच्या आशीर्वादाने मी सुखरुप आहे, अशी प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)