एक्स्प्लोर

अजित पवारांकडे हजारो कोटींची बेनामी संपत्ती, सोमय्यांचा आरोप

Kirit Somaiya Allegations  :  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे हजारो कोटी रुपयांची बेनामी संपत्ती असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलाय.

Kirit Somaiya Allegations  :  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे हजारो कोटी रुपयांची बेनामी संपत्ती असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलाय. सोमवारी पत्रकार परिषद घेत सोमय्या यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. अजित पवार यांच्याकडे हजारो कोटी रुपयांची बेनामी संपत्ती आहे. त्याची उत्तरे त्यांनी द्यावीत. सहा फटाक्यापैकी पहिला फटाका आज फोडलाय, हिंमत असेल तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी समोरासमोर उत्तर द्यावं, असे यावेळी सोमय्या म्हणाले. नवाब मलिकांचे सारे आरोप हे केवळ पवार कुटुंबियांवर सुरू असलेल्या आयटीच्या धाडी लपवण्यासाठीच, हे घाणेरडं राजकारण केवळ शरद पवारच करू शकतात, नवाब मलिकांची तेवढी कुवत नाही. पवार परिवारानं महाराष्ट्राला खूप लुटलंय, असेही सोमय्या म्हणाले. 

पवार कुटुंबाने महाराष्ट्राला लुटलं असल्याचा आरोप यावेळी सोमय्या यांनी केला. ते म्हणाले की,  अजित पवारांकडे एक हजार 50 कोटींची संपत्ती कुठून आली?, यासंदर्भात अजित पवारांनी माहिती द्यावी. पत्रकार परिषदेत यासंदर्भात ते कोणताही माहिती देत नाहीत, असेही सोमय्या म्हणाले. दिवाळीनंतर राज्यातील तीन मंत्री आणि तीन जावई यांचे घोटाळे बाहेर काढणार असं किरीट सोमय्या यांनी रविवारी ट्विट करत सांगितले होते. मात्र, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर किरीट सोमय्या यांनीही पत्रकार परिषद घेत आरोपांची मालिका सुरु केली आहे. सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांनी पवार कुटुंबावर निशाणा साधला. ते म्हणाले, पवार कुटुंबाचे जावई मोहन पाटील यांच्याकडे किती पैसे आले? कुठून पैसे आले? कसे आले? ते कुठे गेले? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. सहा फटाक्यापैकी पहिला फटाका आज फोडलाय, हिंमत असेल तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी समोरासमोर उत्तर द्यावं, असे यावेळी सोमय्या म्हणाले.

'बिल्डर्सकडून अजित पवारांच्या खात्यात शेकडो कोटी रुपये आले आहेत. ते पैसे अजित पवार यांनी कुठे-कुठे ट्रान्सफर केले. जावई, बहिण, बायको, मुलगा आणि आईच्या खात्यात अजित पवार यांनी पैसे ट्रान्सफर केले. अजित पवार यांनी घोटाळ्याचे पैसे पूर्ण कुटुंबात ट्रान्सफर केलेत. 19 दिवसांपासून ईडीच्या धाडी सुरु आहेत. हजार कोटींपेक्षा जास्त बेनामी संपत्ती बाहेर आली आहे. यापासून लक्ष विचलीत व्हावं म्हणून नवाब मलिक यांना पुढे केलं जातेय. नवाब मलिकांची एवढी कपॅसिटी नाही, हे घाणेरडं राजकारण उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं आहे,' असा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय. 

आणखी वाचा :

हे घाणेरडं राजकारण केवळ शरद पवारच करू शकतात, नवाब मलिकांची तेवढी कुवत नाही : सोमय्या

दिवाळीच्या दिवशी नवाब मलिक यांनी लवंगी फटाका लावलाय,  दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार : देवेंद्र फडणवीस
अरुण हलदर यांच्याविरोधात राष्ट्रपतींकडे तक्रार करणार : नवाब मलिक
देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरुन राज्यात ड्रग्जचा खेळ सुरु; नवाब मलिकांचा खळबळजनक आरोप

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
Embed widget