एक्स्प्लोर
खडसेंचा राजीनामा मंजूर, आता नि. न्यायाधीशांमार्फत आरोपांची चौकशी : मुख्यमंत्री
मुंबई : एकनाथ खडसे यांच्या राजीनामा मंजूर केला असून तो माननीय राज्यपाल सी. विद्यासागर यांच्याकडे पाठवला आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी ट्विटरच्या माध्यामातून याबाबतची माहिती दिली आहे.
एकनाथ खडसे यांनी आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार, चौकशीसाठी मुंबई हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश यांची नियुक्ती केली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
अनेक आरोपांच्या चक्रव्युहात अडकलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची अखेर उचलबांगडी झाली. खडसेंनी आपल्या सर्व मंत्रिपदांचा राजीनामा दिला आहे. खडसेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन आपला राजीनामा सुपूर्द केला.
खडसेंनी त्यांच्याकडील महसूल कृषी, पशुसंवर्धन, राज्य उत्पादन शुल्क, दुग्धविकास आणि मस्त्यपालन, अल्पसंख्यांक विकास आणि वक्फ मंत्री ही पदं सोडली आहेत.
यानंतर एकनाथ खडसेंचा राजीनामा स्वीकारल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितंल.
खडसेंवरील आरोप
* कथित पीए गजानन पाटीलकडून खडसेंच्या नावे 30 कोटी लाच मागितल्याचा आरोप, गजानन पाटीलला अटक * जावयाची लिमोझिन कार बेकायदा असल्याचा आरोप * दाऊदच्या कॉलर लिस्टमध्ये खडसेंचा नंबर असल्याचा हॅकरचा दावा * भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी वादएकनाथ खडसे यांची कारकीर्द
*2 सप्टेंबर 1952 रोजी एकनाथ खडसेंचा मुक्ताईनगर तालुक्यातील कोठाळी गावात जन्म झाला. *खडसेंचे वडील शेतकरी होते. प्राथमिक शिक्षण कोठाळी गावातील शाळेतच झालं. *खडसेंना सामाजिक कार्याची आवड असल्याने तरुणपणीच राजकारणात सक्रीय होते. *एकनाथ खडसे 1987 मध्ये खडसे कोठाळी गावचे सरपंच म्हणून निवडून आले. तिथूनच्या त्यांच्या राजकारणाचा श्रीगणेशा झाला *1989 मध्ये मुक्ताईनगर मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. *खडसेची सलग सहा वेळा मुक्ताईनगरमधून विधानसभेसाठी निवड झाली. *1995 मध्ये युती सरकार आल्यानंतर खडसेंनी अर्थ आणि जलसंपदा मंत्री म्हणून काम केलं. *2010 साली विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून एकनाथ खडसेंची निवड झाली. *तर 2014 ची विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर खडसेंना मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार मानले जात होते. *ज्युनिअर असलेल्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याने खडसे नाराज होते, मात्र त्यांची महसूलमंत्रीपदी वर्णी लागली. *एकनाथ खडसे यांची सून रक्षा या जळगाव लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून संसदेत. *खडसे महसूलमंत्री झाल्यानंतर त्यांच्या पत्नी मंदाकिनी या महानंद डेअरीच्या संचालक झाल्या. *तसंच मुलगी रोहिणी खडसे जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी कार्यरत आहेत.
संबंधित बातम्या
अखेर एकनाथ खडसेंचा राजीनामा, सर्व मंत्रिपदं सोडली
खडसेंच्या जागी मुनगंटीवार निश्चित, 15 जूनला पद स्वीकारणार?
नारायण राणेंकडून एकनाथ खडसेंची पाठराखण
दाऊद प्रकरणावरुन लक्ष हटवण्यासाठी खडसेंचा राजीनामा : पृथ्वीराज चव्हाण
जळगावात भाजप कार्यालयात शुकशुकाट, तर शिवसैनिकांनी फटाके फोडले
आजही सांगतो, पुरावे द्या, राजीनाम्यानंतर खडसेंनी ठणकावलं
तथ्यहीन आरोपांना उत्तर देणार नाही : खडसे
खडसेंना पक्षाची भूमिका कळवा, शाहांच्या आदेशानंतर गडकरींचा खडसेंना फोन
‘तो’ अहवाल खडसेंच्या बाजूनंही असू शकतो: रावसाहेब दानवे
खडसेंना मुख्यमंत्र्यांनी बडतर्फच केले पाहिजे: राधाकृष्ण विखे-पाटील
सबळ पुराव्यांशिवाय खडसेंवर बोलणार नाही, अण्णांची भूमिका
खडसेंना मंत्रिमंडळातून बरखास्त करा : पृथ्वीराज चव्हाण
विधानपरिषद निवडणुकीनंतरच खडसेंचा फैसला
एकनाथ खडसे राजीनामा द्या : शिवसेना
एकनाथ खडसेंचं महसूलमंत्रिपद जाणार?
खडसेंची खुर्ची धोक्यात, अमित शहांनी अहवाल मागवला
मुख्यमंत्री दिल्लीत, खडसेंबाबत पक्षश्रेष्ठींसोबत खलबतं होण्याची शक्यता
ती जमीन एमआयडीसीचीच, शिवसेनेचा खडसेंवर बाण
..म्हणून विरोधकांनी शकुनी नीती सुरु केली: एकनाथ खडसे
खडसे-दाऊद कथित कॉलप्रकरणी हॅकर मनिष भंगाळे हायकोर्टात
गंमत म्हणून 30 कोटींची लाच मागितली : गजानन पाटील
‘खडसे-दाऊद कथित कॉलप्रकरणाची केंद्रीय नेतृत्वाकडून दखल’
खडसेंचा मोबाईल, दमानियांचा नंबर आणि दाऊद कॉल प्रकरण
खडसेंना क्लिन चीट, मग दाऊद कॉलप्रकरणात पुन्हा हॅकरची चौकशी का?
दाऊद इब्राहिम कॉलिंग प्रकरण : एकनाथ खडसेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
‘आप’कडून खडसेंच्या चारित्र्यहननाचा प्रयत्न : आंबेडकर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement