केरळ, गोव्याच्या धर्तीवर काजु बोंडुवर प्रक्रिया उद्योग कोकणात आल्यास अर्थकारण बदलेल, युवा शेतकऱ्यांची मागणी
काजु बोंडुवर प्रक्रिया उद्योग कोकणात आल्यास अर्थकारणचं नाही तर कॅलिफोर्नियाला कोकणा सारखं व्हावं असं वाटेलं. पण, हे केव्हा जेव्हा काजु बोंडुवर केरळ, गोव्याच्या धर्तीवर प्रक्रिया उद्योग कोकणात उभारले तर, अशी मागणी कोकणातील युवा शेतकऱ्यांनी केली आहे.
सिंधुदुर्ग : कोकण म्हटलं ही नारळी पोफळीच्या बागा, स्वच्छ सुंदर समुद्र किनारे, आंबा, काजु, फणस आणि कोकणी मेवा डोळ्यासमोर येतो. कोकणात सर्वाधिक क्षेत्र हे काजु लागवडीखाली आहे. काजु लागवड केली की तिसऱ्या वर्षांपासून उत्पादन मिळायला सुरुवात होते. काजूपासून मिळणाऱ्या बीचा उपयोग केला जातो. मात्र, काजु बोंडु पूर्णपणे वाया जातो. केरळ किंवा गोव्याच्या धर्तीवर या काजु बोंडुवर प्रक्रिया उद्योग कोकणात आल्यास कोकणातील शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पादन तर वाढेल व कोकणंच अर्थकारणात मोठी भर पडेल. त्यासोबत रोजगार निर्मिती सुद्धा कोकणात होईल. इतकंच काय तर या काजु बोंडुपासून इथेनॉल गॅस बनतो. तो गॅस बनवल्यास इंधन निर्मिती होऊन गाड्या चालू शकतात.
सिंधुदुर्गातील वेतोरे गावातील युवा शेतकरी सुशांत नाईक आपल्या काजूच्या बागेत अडीच ते तीन टन काजु बी च उत्पादन घेतात. मात्र, काजु बोंड पूर्णपणे वाया जातं. काजु बोंडुपासून शेजारच्या गोवा राज्यात मध्यार्क बनवलं जात. परंतु, सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजु बोंडु वर प्रक्रिया उद्योग नसल्याने काजु बोंड वाया जातो. केरळ, गोवा या दोन राज्यात बोंडु साठी काजुची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र, कोकणातील काजु बोंड पूर्णपणे वाया जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोवा राज्याच्या बाजूच्या भागातील काही भागातील काजु बोंडु गोव्यात मध्यार्क बनवण्यासाठी नेला जातो. कोकणातील वाया जाणारा काजु बोंडु पासून इथेनॉल गॅस बनवू शकतो. जर बोंडु पासून इथेनॉल गॅस तयार झाला तर त्यापासून गाड्या चालू शकतात. पेट्रोल-डिझेलला हा एक पर्याय सुध्दा उपलब्ध होऊ शकतो. याच काजु बोंडुपासून अनेक प्रकारची वेगवेगळी उत्पादने बनवू शकतो. मात्र, शासन आणि कोकण कृषी विद्यापीठाची उदासीनता असल्याने कोकणातील काजु बोंडु वाया जात आहे.
कोकणातील काजु लागवडी खालील क्षेत्र खूप वाढलेलं आहे. मात्र, शासन आणि कोकण कृषी विद्यापीठ पूर्णपणे काजु बोंडुकडे दुर्लक्ष करत आहे. दुसरीकडे काजु बीच्या दरात दरवर्षी घसरण होते. त्यामुळे काजु बी ला हमीभाव मिळावा असं काजू उत्पादक शेतकऱ्यांना वाटतं. तर काजु बी विकून शेतकऱ्यांना जेवढे पैसे मिळतात त्याच्या कितीतरी पटीने त्याच्यावर प्रक्रिया करणाऱ्यांना चागले पैसे मिळतात. त्यामुळे शासनाने हमीभाव तसेच वाया जात असलेला काजु बोंडुवर प्रक्रिया उद्योग सुरु करुन प्रक्रिया केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.
कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले. जर काजु बोंडुवर प्रक्रिया उद्योग सुरू केल्यास कोकणातील शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार उपलब्ध तर होईलच त्यासोबत शेतकऱ्यांना बोंडु विक्रीतुन पैसेही मिळतील. कोकणातील काजु बी मध्ये जेवढा पैसा मिळतो त्यापेक्षाही जास्त पैसा काजु बोंडुवर प्रक्रिया केल्यास कोकणचं अर्थकारण बदलून जाईल. जर सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजु बोंडुवर प्रक्रिया उद्योग सुरु झाल्यास आपला जिल्हा केरळ व्हायला वेळ लागणार नाही. मात्र, यासाठी शासनाने कोकणातील हे काजु बोंडुवर प्रक्रिया उद्योग आणून कोकणातील तरूणांना मुंबई पुण्याला ना जाता या व्यवसायाकडे वळवलं पाहिजे.
काजु उत्पादक शेतकऱ्यांचा आत्मा अभियाना अंतर्गत केरळ मधील काजूच्या मनवती रिसर्च सेंटरला भेट दिली. त्याठिकाणी काजूच्या बोंडुवर प्रक्रिया करून 32 प्रकारची विविध प्रोडक्ट बनवली जातात. आणि ते वर्षेभर केले जातात. काजु बोंडुपासून सरबत, काजु कँडी, सॉफ्ट ड्रिंक, लोणचं असे विविध प्रकारचे 32 प्रोडक्ट काजु बोंडुवर प्रक्रिया करून केरळमध्ये बनवले जातात. मात्र, कोकणात मुबलक प्रमाणात काजु बोंडु असून सुद्धा त्यावर काहीही प्रक्रिया केली जात नाही. हा काजु बोंडु पूर्णपणे वाया जात आहे. हे वाया जाणारे काजु बोंडुवर केरळ किंवा गोव्याच्या धर्तीवर प्रक्रिया केल्यास कोकणचा कॅलिफोर्निया झाल्याशिवाय राहणार नाही अशी धारणा कोकणातील युवा शेतकऱ्याची आहे.
गोव्यातील पेडणे मोपा गावातील गौरव म्हवारणकर हे काजु बोंडुवर प्रक्रिया करतात. या व्यवसायात त्यांची ही तिसरी पिढी आहे. ते काजु बोंडुवर प्रक्रिया करून दारूचे दोन प्रकार बनवतात. जे गोव्यात प्रसिद्ध आहेत. गोव्याची जीआय मानांकन असलेली काजु फेनी ते आपल्या या प्रक्रिया उद्योगात बनवतात. काजु बोंडुवर प्रक्रिया करून बनवली जाणारी काजु फेनी कितीही वर्ष टिकते. काजु फेनीला गोव्यात वर्षभर मागणी असते. पेडणे, डिचोली, साखळी या भागात गोवा राज्यात काजु बोंडुवर प्रकिया केली जाते. दिवसाला एक प्रकिया उद्योगात 3 ते 4 हजार लिटर काजु फेनी किंवा हुराक काजु बोंडुपासून बनवलं जात. त्यातून त्यांना दिवसाला लाखोंचं उत्पन मिळत.