एक्स्प्लोर

कोकणातील एक स्वप्नवत गाव - जुवे बेट!

चमचमणारं पाणी. नारळी-पोफळीच्या बागा. मधोमध भुई... आणि चारी दिशांना पाणी... पाणी... आणि पाणी...

रत्नागिरी: एक गाव... पाण्यानं वेढलेलं... लोकसंख्या 77... आणि मतदार 71.... ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून गावानं कधी निवडणूक पाहिली नाही. अर्थात हे गाव म्हणजे एक  बेटच आहे. रत्नागिरीच्या जैतापूरजवळ धाऊलवल्लीजवळचं जुवे बेट. चमचमणारं पाणी. नारळी-पोफळीच्या बागा. मधोमध भुई... आणि चारी दिशांना पाणी... पाणी... आणि पाणी... राजापूरची अर्जुना नदी अर्धचंद्राकृती आकार जिथे घेत तिथेच हा स्वर्ग उभा आहे. कांदळवनाच्या भूलभुलय्यामधून आपण वाट काढत या जुव्यात पोहोचतो. कोकणातील एक स्वप्नवत गाव - जुवे बेट! अर्थात या बेटावर पोहोचण्यासाठी असलेला एकमेव मार्ग म्हणजे बोट. याबेटावरची लोकसंख्या आहे अवघी 77 त्यातील 71 जणच मतदार. गावचे तब्बल सात सदस्य आणि सरपंच या केवळ 71 लोकातूनच निवडले जातात. पण गेल्या 47 वर्षात या गावाने निवडणूकच अनुभवलेली नाही. पण मग या गावचा गाडा चालतो तरी कसा? तर त्याचं उत्तर म्हणजे गाव एकत्र बसतो आणि चर्चेने सगळ्यांना निवडून देतो . कोकणातील एक स्वप्नवत गाव - जुवे बेट! या बेटावर शाळा आहे... दोन मुलं... आणि एक मास्तर... पण त्या दोन मुलांच्या शिक्षणासाठी मास्तर रोजच्या रोज बोटीनं येतात... या बेटावर मतदानही होत नाही... मदतानासाठी खाडी ओलांडून जावं लागतं... या गावात 77 माणसं असली... तरी घरं मात्र 107... पण बहुतांश बंद... वर्षातून गणपती आणि शिमग्याला मात्र गजबजतात... तशी या गावामध्ये कोणतीच समस्या नाही... पण एक समस्या मात्र या गावाच्या विकासाच्या आड येतेय... आणि तो म्हणजे... नसलेला रस्ता कोकणातील एक स्वप्नवत गाव - जुवे बेट! खारलँड बंधारा बांधून या बेटाला जोडण्याचा प्रयत्न झाला, पण हे सरकारी काम गेल्या ३५ वर्षात कधीच पूर्ण झालेले नाही . निधी खर्ची पडतो पण रस्ता पूर्ण होत नाही. पाण्यात अर्धवट घातलेल्या आणि वाहून गेलेल्या खुणा आजही दिसतात. इतक्या प्रतिकूल स्थितीतही या बेटाला जागतं ठेवलं आहे, ते या पाण्यानं.  सभोवताला खारं पाणी असतानाही... या बेटावर गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत... पण या गावाला आणखी एक गोष्ट खास बनवते. तो म्हणजे या बेटाचा इतिहास. कोकणातील एक स्वप्नवत गाव - जुवे बेट! छत्रपतींच्या काळापासून हे बेट अस्तित्वात होतं आणि त्याच काळात पहिल्यांदा या बेटाचा वापर झाला असल्याचे सांगितले जाते. संभाजी राजांना मोघलांनी संगमेश्वरमध्ये घेरले असताना, ताराबाईंना सुरक्षितपणे याच बेटावर ठेवण्यात आले. इथूनच या बेटाचा वावर सुरु झाला. याचवेळी हे बेट मालोजी खोत शिंदे यांच्या ताब्यात देण्यात आलं, असं इथले गावकरी सांगतात. काय नाही या बेटावर... निसर्ग... आहे... इतिहास... आहे... दुर्गमता... आहे... खाद्यसंस्कृती... आहे... असं असतानाही... हे बेट उपेक्षित आहे.. शांतता अनुभवायची असेल... तर इथं या... माणसांच्या गोंगाटापासून... वाहनांच्या वेगापासून... आणि भौतिक सुखाच्या खुळचट कल्पनांपासून दूर असलेल्या या बेटाच्या तुम्ही प्रेमात पडाल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पोलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पोलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पोलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पोलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Embed widget