Job Majha: अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 


इंडियन बँक, ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड आणि इंडियन कौन्सिल ऑफ फॉरेस्ट्री रिसर्च अँड एज्युकेशनमध्ये मोठी भरती निघाली आहे. त्यासाठी काय पात्रता आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचा ही सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,



इंडियन बँक


सुरक्षा रक्षक पदांच्या 202 जागांसाठी भरती निघाली आहे.


शैक्षणिक पात्रता: 10वी पास, आर्मी नेव्ही किंवा एअरफोर्समधील माजी सैनिक असणे आवश्यक आहे


वयाची मर्यादा: 26 वर्षे


नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत


अर्ज पद्धती : ऑनलाईन


अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 मार्च 2022


अधिकृत संकेतस्थळ : www.indianbank.in


https://drive.google.com/file/d/14Cf_u50ZJFRAfWuK11Zpl1wf5l-DCV-E/view 


----------------------------------------------


ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड


एकूण जागा : 313


पदाचे नाव : मायनिंग सरदार


शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) माइनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा+ओवरमन प्रमाणपत्र (iii) गॅस परिक्षण प्रमाणपत्र (iv) प्रथमोपचार प्रमाणपत्र


वयो मर्यादा : 18 ते 30 वर्षे


नोकरी ठिकाण : पश्चिम बंगाल & झारखंड


अर्ज पद्धती : ऑनलाईन


अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मार्च 2022


अधिकृत संकेतस्थळ : www.easterncoal.gov.in


https://drive.google.com/file/d/1OAr4bVFXb09Uk3JWtKVeA3BeqTdsY4s9/view 


----------------------------------------------------------


इंडियन कौन्सिल ऑफ फॉरेस्ट्री रिसर्च अँड एज्युकेशन


एकूण जागा : 42


पदाचे नाव - विविध पदांकरिता भरती ज्यामध्ये


1) लघुलेखक – 9


2) तांत्रिक सहाय्यक – 2


3) LDC – 9


4) तंत्रज्ञ – 3


5) वनरक्षक – 3


6) एमटीएस – 16


शैक्षणिक पात्रता - 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण


वयोमर्यादा - 18 ते 30 वर्षे


अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 मार्च 2022


अधिकृत बेवसाईट - tfri.icfre.gov.in



https://tfri.icfre.gov.in/recruitment-file/recruitment2.pdf 
--------------------------


महत्त्वाच्या बातम्या: