Job Majha: अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, महापारेषण आणि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. या ठिकाणी भरती सुरू असून त्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज कुठे करायचा आणि त्यासाठी पात्रता काय आहे याची माहिती खालीलप्रमाणे,
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
पोस्ट – असिस्टंट
एकूण जागा – 950
शैक्षणिक पात्रता – पदवीधर
वयोमर्यादा – 20 ते 28 वर्ष
नोकरीचं ठिकाण – मुंबई, नागपूर
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट - opportunities.rbi.org.in
सेंट्रल बँक ऑफ इंडिया
पोस्ट – सेवानिवृत्त अधिकारी
एकूण जागा – 535
नोकरीचं ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2022
अधिकृत वेबसाईट - www.centralbankofindia.co.in
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी, अमरावती
पोस्ट – इलेक्ट्रिशियन अप्रेंटिस
एकूण जागा – 35
शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण, ITI
नोकरीचं ठिकाण- अमरावती
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 फेब्रुवारी 2022
आणि अर्ज तुम्हाला पोस्टाने पाठवायचा असेल तर त्यासाठीची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2022
अर्ज पाठवण्याचा पत्ता लिहून घ्या - कार्यकारी अभियंता, अउदा संवसु विभाग – “प्रकाश सरिता “, प्रशासकीय इमारत, बि विंग, तळमजला, वेलकम पॉईंट जवळ, मोर्शी रोड, अमरावती – 444601
अधिकृत वेबसाईट - www.mahatransco.in
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि.
पोस्ट - सहाय्यक व्यवस्थापक, अधिकारी श्रेणी II, कनिष्ठ अधिकारी
एकूण जागा – 17
शैक्षणिक पात्रता - B.E./B.Tech
वयोमर्यादा – सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी 35 वर्षांपर्यंत, अधिकारी श्रेणी II पदासाठी 33 वर्षांपर्यंत, कनिष्ठ अधिकारी पदासाठी 30 वर्षांपर्यंत
नोकरीचं ठिकाण - मुंबई
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट - www.mscbank.com
संबंधित बातम्या: