Central Railway Recruitment 2022 : भारतीय रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. रेल्वेमध्ये नोकरीची नामी संधी आहे. केंद्रीय रेल्वे बोर्डानं कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदासाठी 20 रिक्त पदांच्या भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. अधिकृत वेबसाईटला भेट देऊन उमेदवार अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 14-03-2022 ठेवण्यात आली आहे.


वयोमर्यादा 


उमेदवाराची वयोमर्यादा अनारक्षित प्रवर्गासाठी 18 ते 33 वर्ष, OBC प्रवर्गासाठी 18 ते 36 वर्ष आणि SC/ST प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्ष आहे.


शैक्षणिक योग्यता 


उमेदवाराकडे स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये चार वर्षांची पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून सिव्हिल इंजिनीअरिंगमधील तीन वर्षांचा डिप्लोमा किंवा तीन वर्षांच्या कालावधीच्या स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये B.Sc चे संयोजन असणे आवश्यक आहे.


वेतन 


उमेदवारांसाठी 25,000 रुपयांपासून 30,000 रुपयांपर्यंत वेतनाची तरतूद 


निवड प्रक्रिया 


उमेदवार त्यांची पात्रता, अनुभव आणि व्यक्तिमत्त्व या आधारे निवड केली जाईल. 


अर्जाचं शुल्क 


SC/ST/OBC/महिला/अल्पसंख्याक/EWS उमेदवारांसाठी अर्ज फी 250 रुपये आहे. इतर सर्व श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्जाची फी 500 रुपये आहे.


असा करा अर्ज 


मध्य रेल्वेची अधिकृत वेबसाइट cr.indianrailways.gov.in वर भेट द्या. होम पेजवर, "कनिष्ठ तांत्रिक सहाय्यकच्या कराराच्या आधारावर रिक्त जागा निवडा. अधिसूचनेमध्ये अर्जाचा फॉर्म देखील आहे. तो तपशीलवार वाचा आणि अर्ज भरा. उपप्रमुख कार्मिक अधिकारी (बांधकाम), मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांचं कार्यालय (बांधकाम), नवीन प्रशासकीय इमारत, 6 वा मजला, अंजुमन इस्लाम शाळेसमोर, डीएन रोड, मध्य रेल्वे, मुंबई CSMT, महाराष्ट्र - 400 001 या पत्त्यावर पाठवा. 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha