मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असून राज्यातील रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 1151 नव्या रुग्णांची भर पडली आहे. राज्यात आज 23 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 2 हजार 594 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज 23 महानगरपालिकांमध्ये कोरोनाचा एकही मृत्यू झालेला नाही.
राज्यात आज एकही ओमायक्रॉनबाधितांची नोंद नाही
राज्यात आज एकही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 4509 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 4345 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. सध्या राज्यात 164 ओमायक्रॉनचे रुग्ण अॅक्टिव्ह आहेत
राज्यात आज 23 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 23 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77 लाख 2 हजार 217 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.97 टक्के आहे. सध्या राज्यात 1 लाख 64 हजार 050 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 922 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 74 लाख 84 हजार 114 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत 168 नवे कोरोनाबाधित
मुंबईत कमी होणारी रुग्णसंख्या सोमवारनंतर मंगळवारी काहीशी वाढल्याचं पाहायला मिळालं. आजही रुग्णसंख्येत काहीसा चढ पाहायला मिळाला आहे. मागील 24 तासांत 168 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. मंगळवारी हीच रुग्णसंख्या 135 होती. दरम्यान आज 255 जण कोरोनामुक्त देखील झाले असून त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- गेल्या 24 तासात देशात 15 हजार 102 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 278 जणांचा मृत्यू
- Mumbai Local : लोकल ट्रेन, मॉल्स येथे केवळ लसीकरण पूर्ण झालेल्याच व्यक्तींना प्रवेश देण्याचा निर्णय आता मागे घ्यायला हवा : हायकोर्ट
- Covid Vaccination : भारतात Covishieldसह अनेक लसी सध्या वापरात, तर 'या' पाच लसींची भारताला प्रतिक्षा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha