एक्स्प्लोर

Solapur Accident : अक्कलकोटवरुन सोलापूरला जाणाऱ्या जीपला अपघात, पाच जणांचा मृत्यू

Accident on Akkalkot solapur road : अक्कलकोटवरुन सोलापूरला जाणाऱ्या जीपचा टायर फुटल्यामुळे भीषण अपघात झालाय. या अपघातांमध्ये पाच जणांचा मृत्यू झालाय. तर पाच ते सहा जण जखमी झाले आहेत.

Solapur Accident News :  अक्कलकोटवरुन सोलापूरला जाणाऱ्या जीपचा टायर फुटल्यामुळे भीषण अपघात झालाय. या अपघातांमध्ये पाच जणांचा मृत्यू झालाय. तर पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. कुंभारी जवळील गंगाप्रसाद पेट्रोलपंप समोर ही घटना घडली. एसटी बंद असल्याने सर्वजण सोलापूरकडे खासगी जीपने प्रवास करत होते, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. वळसंग पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून मदत पोहचवली जात आहे. 

सोलापुरातील कुंभारी जवळील गंगाप्रसाद पेट्रोलपंप समोर सकाळी साडे दहाच्या सुमारास हा अपघात झाला. मृतांपैकी 3 जण पुरुष आणि 2 महिला आहेत. कट्ट्यावा यल्लप्पा बनसोडे (वय 55), बसवराज यल्लप्पा बनसोडे (वय 42), आनंद इर्राप्पा गायकवाड ( वय 25 रा. ब्यागेहाळी, ता.अक्कलकोट), लक्ष्मण मुरलीधर शिंदे, (42, बनजगोळ तालुका अक्कलकोट) आणि एक अनोळखी महिला (अंदाजे वय 35)  अशी  मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर निसार अमरोद्दीन पिरजादे  (वय 50), अक्षय लक्ष्मण शिंदे (वय 19),  आनंद युवराज लोणारी (वय 28),  समर्थ प्रशांत अनंत (वय 20), विशाल दगडू गोरसे (वय 24),  गुरुराज राजेंद्र वंजारे (वय 28), सैपन इब्राहिम वाडीकर (वय 60) अशी जखमींची नावे आहे. 
 
 एसटीचा संप सुरू असल्याने अनेक प्रवासी खासगी वाहतुकीचा मार्ग निवडत आहेत. त्यातच अक्कलकोट स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी देखील भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. एसटी बंद असल्याने पर्यायी वाहतूक म्हणून जीपचा वापर करण्यात आला होता. मात्र जीपचा समोरचा चाक फुटल्याने गाडी पलटी झाली. त्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातातील जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी दिली. 

नुकत्याच झालेल्या कार्तिक एकादशीनिमित्त पंढरपूर, अक्कलकोट व गाणगापूर असा प्रवास करणाऱ्यांचा समावेश होता. अक्कलकोटवरुन परतत असताना काळानं घाला घातला. जखमींवर जवळलील रुग्णालयात उपचार केले जात आहेत. अपघातातील लोकांची अद्याप ओळख पटलेली नाही. कुंभारी गावातील स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हा परिसर अपघातप्रवण क्षेत्र झालाय. या ठिकाणी आतापर्यंत पंधरा ते वीस मोटारसायकलचे अपघात झाले आहेत.

संबधित बातम्या : 

Siddharam Mhetre:थकीत ऊसबिलाची रक्कम मागयला गेलेल्या शेतकऱ्यांवर माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे भडकले 
Solapur Toll Naka : सोलापूर-अक्कलकोट रोडवर प्रवाशांची लूट, दोनदा भरावा लागतो टोल

अधिक पाहा..

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : 'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Fact Check : नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
Pune Crime : धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM : 10 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News : 10 December 2024  : सुपरफास्ट बातम्या : ABP MajhaTop 25 Superfast News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 10 Dec 2024Maharashtra Fake Crop Insurance Issue:  महाराष्ट्रात बोगस विम्याचं भरघोस पीक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : 'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Fact Check : नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
Pune Crime : धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
JCB full form : खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
Embed widget