सोलापूर जिल्ह्यात भाजपचा स्वबळाचा नारा! नगराध्यक्ष पदाचे सर्व उमेदवार कमळ चिन्हावरच लढणार, पालकमंत्री गोरेंचं मोठं वक्तव्य
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय नेत्यांनी गाठी भेटी दौरे सुरु केले आहेत.
Jayakumar Gore : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय नेत्यांनी गाठी भेटी दौरे सुरु केले आहेत. तसेच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील सुरु केल्या आहेत. दरम्यान, महायुती एकत्र लढणार की स्वतंत्र? याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्या, अशातच सोलापूर जिल्ह्यात भाजप स्वबळावर लढणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. कारण सर्व उमेदवार कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सर्व 11 नगरपालिका आणि एक नगरपंचायत मधील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निश्चित झाले आहेत. भाजप सर्व ठिकाणी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती खुद्द सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांनी दिली आहे.
17 तारखेला सकाळी नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांची यादी जाहीर होणार
जयकुमार गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 तारखेला सकाळी नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांची यादी जाहीर होणार आहे. नगराध्यक्ष पदाचे सर्व उमेदवार कमळ चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचे गोरे म्हणाले. दरम्यान, आता भाजपच्या या निर्णयानंतर महायुतीमधील इतर मित्रपक्ष नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
4 नोव्हेंबरला राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत मतदानाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 3 डिसेंबर रोजी होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी 4 नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार
राज्यातील 29 महापालिका, 32 जिल्हा परिषदा, 42 नगर पंचायती, 336 पंचायत समिती, 246 नगरपालिकांची मुदत संपली असून त्यासाठी निवडणुका घेण्यात येणार आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी 31 ऑक्टोबरला प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार मतदान होणार आहे. त्यामध्ये एकूण 1 कोटी 7 लाख 3 हजार 576 मतदार असतील. त्यासाठी राज्यात एकूण 13 हजार कन्ट्रोल युनिट स्थापन करण्यात आले आहेत.
विभागनिहाय नगरपरिषद-नगरपंचायती निवडणूक
कोकण - 17
नाशिक -49
पुणे -60
संभाजीनगर -52
अमरावती -45
नागपूर -55
कसे असेल निवडणुकीचे वेळापत्रक?
नामनिर्देशन पत्र - 10 नोव्हेंबर
अंतिम मुदत - 17 नोव्हेंबर
छाननी - 18 नोव्हेंबर
अर्ज माघारी घेण्याची तारीख - 21 नोव्हेंबर
निवडणूक चिन्ह वाटप - 26 नोव्हेेबर
मतदान - 2 डिसेंबर
निकाल - 3 डिसेंबर
महत्वाच्या बातम्या:
























