एक्स्प्लोर

बुलडाण्यातील जवान कारगीलमध्ये शहीद, हिमस्खलनात दुर्दैवी मृत्यू, आज अंत्यसंस्कार

बुलडाणा जिल्ह्यातील पळसखेड चक्का येथील जवान प्रदीप मांदळे हे कर्तव्यावर असताना काश्मीरमधील द्रास सेक्टरमध्ये हिमस्खलनात शहीद झाले.आज पळसखेड चक्का येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील पळसखेड चक्का येथील जवान प्रदीप मांदळे हे कर्तव्यावर असताना काश्मीरमधील द्रास सेक्टरमध्ये गेल्या मंगळवारी हिमस्खलनात शहीद झाले. कारगील व द्रास भागातील भागातील हवामान खराब असल्याने त्यांचा पार्थिव त्यांच्या मूळ गावी आणण्यास उशीर झाला. त्यांचं पार्थिव आज त्यांच्या मूळ गावी आणण्यात येणार असून सकाळी 10 वाजता बुलडाण्यातील पळसखेड चक्का येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील पळसखेड चक्का या छोट्याशा गावातील शहीद प्रदीप मांदळे हे महार रेजिमेंटमध्ये 2009 साली सैन्यात भरती झाले होते. गावातीलच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व नंतर किनगाव राजा येथे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलंय. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने त्यांनी काही दिवस खाजगी कंपनीतही काम केलं. 2009 मध्ये सैन्यात दाखल झाल्यावर त्यांनी पुणे येथे व नंतर जम्मू काश्मीर मधील वेगवेगळ्या भागात देशसेवा केली.

त्यांच्या पाश्चात्य त्यांच्या आई, पत्नी, तीन मुलं व भाऊ आहेत. त्यांच्या आई आजारी असल्याने त्या औरंगाबादच्या रुग्णालयात भरती आहेत. सध्या ते कारगील मधील द्रास सेक्टरमध्ये कर्तव्यावर होते. मंगळवारी द्रास भागात झालेल्या हिमस्खलनात काही सैनिक गस्तीवर असताना त्याखाली सापडले व त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या भागातील हवामान खराब असल्याने त्यांचा मृतदेह शोधून मूळगावी आणण्यास उशीर झाला. सकाळी त्यांचं पार्थिव औरंगाबाद येथून सकाळी पळसखेडा चक्काकडे घेऊन निघाले आहेत. सकाळी 10 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासनाने अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण केली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget