एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विनय कोरे महायुतीत, 'स्वाभिमानी'चे राजू शेट्टी नाराज
मुंबई : विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्षही आता महायुतीत सहभागी झाला आहे. विनय कोरे यांनी यासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी महायुतीत आपला पक्ष सहभागी झाल्याची घोषणा केली आहे.
कुठल्याही अपेक्षेविना महायुतीत आल्याचं विनय कोरेंनी म्हटलं आहे. जनसुराज्य पक्षाचं कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज निवडणुकांवर प्राबल्य आहे. मात्र जनसुराज्य पक्ष महायुतीमध्ये आल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींनी नाराजी व्यक्त केली आहे.
'जनसुराज्य महायुतीत सामील झाल्याचा निर्णय माध्यमांतून समजला, त्याबाबत चर्चा करण्यात आली नाही. जनसुराज्यचे आमदार-खासदार नाहीत, त्यामुळे प्रवेश म्हणजे नेमकं काय झालं हेच माहित नाही.' असं शेट्टी म्हणाले. त्याचवेळी हरकतही नाही, विरोधही नाही, परंतु स्थानिक पातळीवर एकत्र लढण्याची सुतराम शक्यता नसल्याचं शेट्टींनी स्पष्ट केलं.
महायुतीत आणखी एका पक्षाची मोट, जनसुराज्यचा समावेश होणार
'महायुतीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढल्याच पाहिजेत, असं काही बंधन घटकपक्षांवर नाही. प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार निवडणुका लढवाव्यात, असं भाजप प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केलं आहे.' असं राजू शेट्टींनी सांगितलं. विनय कोरे हे वारणा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष असून दूध आणि साखर व्यवसायात त्यांचा जम बसला आहे. सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात त्यांचा प्रभाव आहे. विनय कोरे यांनी अपारंपरिक ऊर्जा आणि फलोत्पादन या खात्याचे मंत्री म्हणून जबाबदारी निभावली आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांच्या सरकारमध्ये ते मंत्री होते.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
सोलापूर
निवडणूक
Advertisement