(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jammu Kashmir Temperature : जम्मू काश्मीरमध्ये तापमान वाढलं, 76 वर्षांचा रेकॉर्ड मोडला
Jammu Kashmir Weather : हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस जम्मूमध्ये तापमान वाढण्याची शक्यता आहे. तसेच येत्या आठवड्यात पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे.
जम्मू : थंड आणि बर्फाळ प्रदेश समजल्या जाणाऱ्या जम्मू काश्मिर परिसरातही तापमान वाढलं, अनेक ठिकाणी उष्मघाताची लाट आल्याचं पाहायला मिळतंय. जम्मूत आज 35.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. तर तापमानाने 76 वर्षांचा रेकॉर्डही मोडला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस जम्मूमध्ये तापमान वाढण्याची शक्यता आहे. तसेच येत्या आठवड्यात पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या अगोदर 31 मार्च 1945 साली 37.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. मात्र रविवारच्या तापमानाने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. साधरणपणे हे नेहमीच्या तापमानापेक्षा 8 अंश सेल्सिअसने तापमान अधिक होते. रात्री मात्र 16.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली
जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये देखील तापमान वाढत आहे. श्रीनगरमध्ये कमाल तापमान 25 अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले होते. म्हणजे नेहमीच्या तापमानापेक्षा 7.4 अंशाने तापामान वाढले होते. तर रात्री तापमान 7.2 अंश सेल्सिअलस तापमान होते. तर कटरा माता वैष्णोदेवी येथे तापमान 32.3 अंश सेल्सिअस आणि किमान 16.7 अंश तापमानाची नोंद झाली.
पुढील पाच दिवस महाराष्ट्र तापणार
दरम्यान महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढला असून पुढील पाच दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. विदर्भ, खान्देश आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांतील तापमान सरासरीच्या 4.5 ते 6.4 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
29 मार्च रोजी पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला आणि बुलढाण्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. 30 मार्च रोजी खान्देशातील जळगाव, मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, तर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोलीत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्यामुळे या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. संपूर्ण पश्चिम विदर्भात तापमान सरासरीच्या 4.5 अंश ते 6.4 अंश सेल्सिअस वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 31 मार्च रोजी देखील राज्यात जैसे थे परिस्थिती कायम राहणार आहे. चंद्रपुरात तापमान वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha