एक्स्प्लोर

जालन्यातील नवविवाहितेच्या हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार : गृहमंत्री

जालन्यात एकतर्फी प्रेमातून नवविवाहितेची 30 जून रोजी हत्या झाली होती. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

जालना : जालना जिल्ह्यातील मंठा इथल्या नवविवाहितेच्या हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. पीडित कुटुंबाला न्याय मिळेल, असं आश्वासनही गृहमंत्र्यांनी दिली. या संबंधात अनिल देशमुख यांनी ट्वीट केलं आहे.

वैष्णवी गोरे नावाच्या नवविवाहितेची 30 जून रोजी हत्या झाली होती. वैष्णवीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या आरोपीने भर बाजारात चाकूने गळा कापून तिची निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर मंठा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकतर्फी प्रेमातून विवाहित तरुणीची गळा चिरुन हत्या; आरोपीचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी कालच (3 जुलै) पीडित कुटुंबाची भेट घेऊन "हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि कायद्याच्या चौकटीत राहून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी," अशी मागणी केली होती. त्यानंतर "संबंधित घटना निंदनीय आहे. ही केस फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवली जाईल आणि गोरे कुटुंबीयांना लवकरात लवकर न्याय मिळवून दिला जाईल," असं ट्वीट गृहमंत्र्यांनी केलं.

जालन्यातील नवविवाहितेच्या हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार : गृहमंत्री

काय आहे प्रकरण? वैष्णवी गोरे नावाच्या 19 वर्षीय तरुणीचा 26 जून रोजी जालन्यातील तरुणासोबत विवाह झाला होता. मांडव परतणीसाठी ही तरुणी 28 जून रोजी माहेरी आली होती. तर 30 जून रोजी ही तरुणी आई आणि मैत्रिणीसोबत खरेदीसाठी बाजारात गेली होती. मात्र काही वेळाने आई परत घरी गेली. हिच संधी साधत आरोपीने तरुणीची हत्या केली. शेख अल्ताफ शेख बाबू असं 26 वर्षीय आरोपीचं नाव आहे. त्याचं या तरुणीवर एकतर्फी प्रेम होतं. परंतु तिचं लग्न झाल्याच्या रागातून आरोपीने तिची हत्या केली. त्यानंतर अटकेच्या भीतीने त्याने विष प्राशन केलं होतं. त्याची प्रकृती स्थिर असून पोलिसांच्या ताब्यात आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महायुतीत खातेवाटप नेमकं कधी होणार? भरत गोगावलेंनी स्पष्टच सांगितलं, रायगडच्या पालकमंत्रीपदावरही महत्त्वाचं भाष्य; म्हणाले...
महायुतीत खातेवाटप नेमकं कधी होणार? भरत गोगावलेंनी स्पष्टच सांगितलं, रायगडच्या पालकमंत्रीपदावरही महत्त्वाचं भाष्य; म्हणाले...
धबधब्यावर तरुण-तरुणीला विवस्त्र केले; पैसे काढून घेतले, पीडिता म्हणाली, मी विनवणी करत राहिलो, त्यांनी मला नग्न केले
धबधब्यावर तरुण-तरुणीला विवस्त्र केले; पैसे काढून घेतले, पीडिता म्हणाली, मी विनवणी करत राहिलो, त्यांनी मला नग्न केले
Mumbai Boat Accident: नौदलाच्या अधिकाऱ्याने स्वत:चा जीव देऊन मोठा अनर्थ टाळला, अन्यथा नीलकमल बोटीचा स्फोट....
नौदलाच्या अधिकाऱ्याने स्वत:चा जीव देऊन मोठा अनर्थ टाळला, अन्यथा नीलकमल बोटीचा स्फोट....
Maharashtra school uniform Scheme: सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, शालेय गणवेश वाटपासंदर्भात मोठा निर्णय
सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, शालेय गणवेश वाटपासंदर्भात मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Pune News : महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार? राऊतांच्या वक्तव्याने चर्चाRajkot Fort Update : राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा नव्यानं पुतळा उभारण्यात येणार #ABPmajhaDhananjay Munde : विधानसभा कामकाजात आज पहिल्यांदाच मंत्री धनंजय मुंडे सहभागी होणारABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 21 December  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महायुतीत खातेवाटप नेमकं कधी होणार? भरत गोगावलेंनी स्पष्टच सांगितलं, रायगडच्या पालकमंत्रीपदावरही महत्त्वाचं भाष्य; म्हणाले...
महायुतीत खातेवाटप नेमकं कधी होणार? भरत गोगावलेंनी स्पष्टच सांगितलं, रायगडच्या पालकमंत्रीपदावरही महत्त्वाचं भाष्य; म्हणाले...
धबधब्यावर तरुण-तरुणीला विवस्त्र केले; पैसे काढून घेतले, पीडिता म्हणाली, मी विनवणी करत राहिलो, त्यांनी मला नग्न केले
धबधब्यावर तरुण-तरुणीला विवस्त्र केले; पैसे काढून घेतले, पीडिता म्हणाली, मी विनवणी करत राहिलो, त्यांनी मला नग्न केले
Mumbai Boat Accident: नौदलाच्या अधिकाऱ्याने स्वत:चा जीव देऊन मोठा अनर्थ टाळला, अन्यथा नीलकमल बोटीचा स्फोट....
नौदलाच्या अधिकाऱ्याने स्वत:चा जीव देऊन मोठा अनर्थ टाळला, अन्यथा नीलकमल बोटीचा स्फोट....
Maharashtra school uniform Scheme: सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, शालेय गणवेश वाटपासंदर्भात मोठा निर्णय
सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, शालेय गणवेश वाटपासंदर्भात मोठा निर्णय
मोठी बातमी : मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं; दाट धुक्यामुळे मुंबईकरांच्या लाईफलाईनवर परिणाम, रेल्वे वाहतूक मंदावली
मोठी बातमी : मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं; कर्जत, कसारा परिसरात धुक्याची चादर
ऑस्करच्या शर्यतीत असलेला युकेचा हिंदी सिनेमा आता होणार भारतात प्रदर्शित, 'या' दिवसापासून 'संतोष' येणार प्रेक्षकांच्या भेटीला
ऑस्करच्या शर्यतीत असलेला युकेचा हिंदी सिनेमा आता होणार भारतात प्रदर्शित, 'या' दिवसापासून 'संतोष' येणार प्रेक्षकांच्या भेटीला
धक्कादायक! पार्किंगच्या वादातून 41 वर्षीय व्यक्तीची हत्या, लोखंडी पाईप, हातातील कड्यानं बेदम मारहाण
धक्कादायक! पार्किंगच्या वादातून 41 वर्षीय व्यक्तीची हत्या, लोखंडी पाईप, हातातील कड्यानं बेदम मारहाण
D Gukesh Tax : विश्वविजेत्या गुकेशसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 4.67 कोटींचा कर माफ, आता मिळणार तब्बल इतके कोटी रुपये!
विश्वविजेत्या गुकेशसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 4.67 कोटींचा कर माफ, आता मिळणार तब्बल इतके कोटी रुपये!
Embed widget