एक्स्प्लोर

उद्या अल्टीमेटमनुसार शेवटचा दिवस; निरोप न आल्यास सलाईन काढणार, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Jalna Protest: जरांगे यांचं शिष्टमडळ आज मुंबईत येऊन सरकारशी चर्चा करणार आहे. या शिष्टमंडळात 16 ते 17 सदस्य असणार आहेत.

जालना : जालन्यातील (Jalna Protest)  आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील मराठा आरक्षणाच्या (Maratha Resrvation) मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या उपोषणाचा आज अकरावा  दिवस आहे. मनोज जरांगे यांनी उपोषण सोडावं, अशा विनंतीचं पत्रही सरकारने दिले आहे. पण जरांगे-पाटील यांनी हा प्रस्ताव फेटाळला आहे.आता जरांगे-पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “ मागण्यांसदर्भत सरकारचा अद्याप निरोप आलेला नाही, उद्या माझ्या अल्टीमेटमनुसार शेवटचा दिवस आहे. उद्यापर्यंत  निरोप न आल्यास सलाईन काढणार, पाणी बंद करणार” असा इशारा जरांगे-पाटील यांनी दिला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मनोज जरांगे म्हणाले, सरकारसाठी आम्ही एक पाऊल मागे आलो. रात्रीच निरोप येणार होता मात्र अजून सरकारचा निरोप नाही. आज  आम्ही सरकारच्या निरोपाची वाट पाहत आहे. सरकारचा निरोप येईपर्यंत नाव जाहीर करणार नाही. तज्ञ, वकील, शेतकरी असे 20 आणि 21 लोक शिष्टमंडळात असतील. आमच्याकडून देखील चर्चेची दार खुली आहे. उद्या दिवसभर पर्यंत मी सरकारची वाट पाहील. सरकारसाठीच मी सलाईन घेतलं. उद्या शेवटचा दिवस आहे.  यानंतर हे सर्व बंद करणार आहे. सलाईन काढणार आणि पाणी देखील सोडणार आहे. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. 

 सरकारच्या जीआरमधून वंशावळी शब्द वगळून त्याऐवजी सरसकट मराठा समाज टाकावा, या मागणीसाठी मनोज जरांगेंचं उपोषण सुरूच राहणार आहे. सरकारने कुणबी-मराठा किंवा मराठा-कुणबी अशा नोंदी असलेल्या मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचा जीआर काढला. त्यातील वंशावळी शब्दाला जरांगे यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे मनोज जरांगे यांनी उपोषण सोडावं, अशा विनंतीचं पत्रही सरकारकडून देऊनही त्यांनी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार केला. 

जरांगे यांनी सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केल्यावर यावर नक्की तोडगा काढू असे खोतकर म्हणाले. तसेच मनोज जरांगे यांनी यावर चर्चा करण्यासाठी एक शिष्टमंडळ मुंबईला पाठवावे किंवा त्यांनी स्वतः यावे. त्या बैठकीत काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करू असे खोतकर म्हणाले. तर खोतकर यांची मागणी स्वीकारून एक शिष्टमंडळ मुंबईला पाठवणार आहे.  मनोज जरांगे यांचं शिष्टमडळ आज मुंबईत येऊन सरकारशी चर्चा करणार आहे. या शिष्टमंडळात 16 ते 17 सदस्य असणार आहेत. ज्यात अभ्यासक, आंदोलक आणि शेतकऱ्यांचा समावेश असेल. हे शिष्टमंडळ मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले देण्याबाबत सरकारसोबत चर्चा करणार आहे.

हे ही वाचा :

Jalna : मनोज जरांगेंच्या भेटीसाठी वेटिंग, उपोषणास्थळी गर्दीच गर्दी; राज्यभरातून लोक येतायत अंतरवाली सराटी गावात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget