एक्स्प्लोर
जळगावात धरणात बुडालेल्या ट्रकची चाकं-बॅटरी लंपास
चालकाला झोप लागल्याने जळगावात पाण्यात बुडालेल्या ट्रकची चाकं आणि बॅटरीच चोरीला गेली.
जळगाव : जळगावात हॉलिवूड चित्रपटांनाही लाजवेली अशी धडाकेबाज चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. चालकाला झोप लागल्याने पाण्यात बुडालेल्या ट्रकची चाकं आणि बॅटरीच चोरीला गेली.
ट्रक चालकाला झोप लागल्यामुळे दोन दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात बोरी धरणामध्ये ट्रक बुडाला होता. तिसऱ्या दिवशी क्रेनच्या सहाय्याने ट्रक पाण्याबाहेर काढण्यात ट्रक मालकाला यश मिळालं. मात्र धरणात खोलवर बुडालेल्या अवस्थेतही या ट्रकची मागील दोन चाकं आणि बॅटरी लंपास झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
चालक झोपल्याने ट्रकला जलसमाधी
ट्रक चालकाने धरणाच्या विहिरीवर ट्रक उभा केला. मात्र चालकाला झोप लागल्याने रात्रभरात ट्रक पाण्याच्या वेढ्यात सापडला. ट्रक बुडाल्याची रंजक कहाणी समोर आली असतानाच त्याहून इंटरेस्टिंग गोष्ट समोर आली. ट्रक बुडाल्याच्या तिसऱ्या दिवशी ट्रक मालकाने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली दोन क्रेनचा वापर करुन ट्रक धरणातून बाहेर काढला. मात्र बाहेर आलेल्या ट्रकची मागील दोन चाकं आणि बॅटरी नाहीशी झाली आहेत. ट्रक मालक हरिभाऊ गंगाधर यांना हसावं की रडावं असा प्रश्न निर्माण झाला आहे. धरणाच्या तीनशे मीटर अंतरावर हा ट्रक पूर्णपणे पाण्यात बुडालेला असतानाही चोरटयांनी पाण्यात आपली कमाल दाखवल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement