एक्स्प्लोर

जळगाव महापालिकेत खरी लढत शिवसेना आणि भाजपातच!

जळगाव महापालिकेत भाजप आणि शिवसेनेकडून युतीसाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र स्थानिक पातळीवरचा विरोध पाहता दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.

जळगाव : भाजप आणि शिवसेनेने जळगाव महापालिकेत निवडणुकीत अगोदर प्रयत्न केला, मात्र भाजप नेते एकनाथ खडसे यांच्यासह भाजपमधील युतीला अंतर्गत विरोध पाहता ही युती होऊ शकली नाही. त्यामुळे दोन्ही पक्ष मोठ्या ताकदीनिशी समोरासमोर उभे आहेत. जळगाव महापालिका निवडणुकीसाठी एक ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे जोरदार प्रचार सुरु आहे. जळगाव महापालिकेतील सत्तेचा इतिहास पाहता गेली 40 वर्षे सुरेश जैन गटाकडेच अखंडपणे ही सत्ता असल्याचं पाहायला मिळतं. या सत्तेला आजपर्यंत कुणीही धक्का लावू शकलं नाही. आताच्या निवडणुकीतही शिवसेनेला बहुमत मिळेल असा विश्वास सुरेश जैन यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील राजकीय अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर जळगाव महापालिकेचा विकास मात्र होऊ शकला नाही. विविध आरोप आणि घोटाळ्याच्या गर्तेत अडकलेल्या सुरेश जैन यांना आपला राज्यकारभार महापालिकेत सुरळीत चालण्यासाठी सरकारच्या पाठबळाची आवश्यकता भासू लागली आहे. या पार्श्वभूमीवर सुरेश जैन यांनी जळगाव निवडणुकीत शिवसेना आणि भाजपच्या युतीचा प्रस्ताव गिरीश महाजन यांच्या मध्यस्तीमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यासमोर ठेवला. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनीही अनुकूलता दाखवली होती. मात्र भाजप नेते एकनाथ खडसे यांच्यासह आमदार सुरेश भोळे आणि कार्यकर्त्यांचा विरोध समोर आल्याने या युतीला मूर्त स्वरूप येऊ शकले नाही, असं बोललं जात आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेनेचे नेते सुरेश जैन यांच्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेते युती करण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र युतीसाठी प्रयत्न सुरु असताना गिरीश महाजन यांनी मात्र विविध पक्षातील इच्छुक उमेदवारांना आपल्या गोटात सहभागी करण्याचे प्रयत्न सुरु ठेवले होते. महाजन यांच्या या प्रयत्नाला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. मनसेच्या महापौरांसह मनसेचे 12 नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच नगरसेवक भाजपात सहभागी झाल्याने भाजपाची ताकद नक्कीच वाढली आहे.  गेल्या निवडणुकीत केवळ 15 जागा मिळवणाऱ्या भाजपला यंदा बहुमताने विजयी होण्याचा विश्वास वाटू लागला आहे. मात्र गेली 40 वर्षे अखंड सत्ता असलेल्या सुरेश जैन यांच्या शिवसेनेला ते शह देऊ शकतात का, याकडे सर्वांचं लक्ष आहे. या निवडणुकीची भाजपकडून सर्वच सूत्र गिरीश महाजन हाताळत असल्याचं चित्र आहे. तर दुसरीकडे एकनाथ खडसे मात्र जळगाव महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेपासून काही अंतरावरच आहेत. गिरीश महाजन यांनी मात्र खडसे आमच्यासोबतच असल्याचा दावा केला आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपकडून सर्वच्या सर्व 75 जागा लढवल्या जात आहेत. तर शिवसेनेकडून 70 जागा लढवल्या जात असल्याने खरी लढत आता शिवसेना आणि भाजपमध्येच दिसणार आहे. एकीकडे शिवसेना आणि भाजप यांच्यात ‘काटे की टक्कर’ होण्याची चिन्हे असताना त्यांना शह देण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रितरित्या लढण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसला आजपर्यंत जळगाव महापालिकेत एकही जागा मिळवता आलेली नाही. राष्ट्रवादीला ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने खिंडार पाडल्याने पक्षाला मोठा हादरा बसला आहे. त्यांना आता किती जागा मिळवता येतात हाच खरा प्रश्न आहे. विकासाच्या मुद्यावर आपल्याला लोक निवडून देतील असा विश्वास काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना आहे. राष्ट्रवादी 43 जागांवर, तर काँग्रेसने 16 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Rain Update: देशात 13 टक्के पर्जन्य तूट; एल निनोमुळे शेतकरी मोठ्या संकटात, राज्यात सप्टेंबरमध्येही पावसाची ओढ? हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट
देशात 13 टक्के पर्जन्य तूट; एल निनोमुळे शेतकरी मोठ्या संकटात, राज्यात सप्टेंबरमध्येही पावसाची ओढ? हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट
Pune Crime News: नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
Narendra Dabholkar and Sachin Andure: मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
Embed widget