एक्स्प्लोर
Advertisement
मुख्यमंत्री आणि खडसेंचा एकाच गाडीतून प्रवास
महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही नेत्यांसोबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे देखील होते.
जळगाव : राज्याची माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची नाराजी दूर झाल्याची चर्चा सध्या भाजपमध्ये सुरु आहे. कारण, सोमवारी (08 ऑक्टोबर) जळगावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे हे दोन्ही नेते एकाच गाडीतून प्रवास करताना दिसले. त्यामुळे राजकीय क्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सोमवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री संभाजी राजे नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा आटोपून बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यासाठी जळगावहून वामभोरी इथे निघाले. विद्यापीठाकडे जाताना मुख्यमंत्री आणि खडसे एकाच गाडीतून गेले. महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही नेत्यांसोबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे देखील होते.
विविध आरोपांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांना पायउतार व्हावं लागल्यानंतर त्यांनी अनेक वेळा राज्य सरकारविरोधात आपली नाराजी उघड केली आहे. आपल्याला जाणीवपूर्वक दूर ठेवल्याचा आरोपही खडसेंनी बऱ्याच वेळा केला आहे. एकीकडे मंत्रीमंडळाचा विस्ताराच्या आणि त्यात खडसेंच्या समावेशाबाबत चर्चा सुरु असताना, खडसे, मुख्यमंत्री आणि गिरीश महाजन यांचा एकत्रित प्रवास आता चर्चेचा विषय बनला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
कोल्हापूर
विश्व
राजकारण
Advertisement