एक्स्प्लोर

मराठा क्रांती मोर्चाचा आज राज्यभर ‘जेलभरो’

आधी पन्नासहून अधिक मूक मोर्चे काढूनही सरकारला जाग न आल्याची टीका करत, मराठा क्रांती मोर्चाने अखेर ठोक मोर्चे काढण्याचा निर्णय घेतला आणि राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत.

मुंबई : मराठा क्रांती मोर्चाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी आज मुंबईसह राज्यभरात विविध ठिकाणी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. आधी मूक मोर्चे, ठोक मोर्चे आणि आता जेलभरो आंदोलन करण्यात येत आहे. सार्वत्रिक जेलभरो मुंबईतल्या आझाद मैदानावर सार्वत्रिक जेलोभरो आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईत 11 वाजल्यापासून या आंदोलनाला सुरुवात होईल. तर तिकडे ठाणे, परभणी, नंदुरबार, मनमाड, इंदापूर इथंही मराठा मोर्चाकडून सार्वत्रिक जेलभरो केला जाणार आहे. जुन्नर बंदची हाक पुण्यातल्या जुन्नर तालुक्यात मराठा संघटनांकडून बंदची हाक देण्यात आली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जुन्नर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शाळांना एक दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. आम्हीच आरक्षण देऊ मराठा आरक्षणासाठी कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागतील, राज्य सरकार या बाबी निश्चित पूर्ण करणार आहे, कायमस्वरुपी टिकणारं आरक्षण आमचंच सरकार देईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत छत्रपती राजाराम महाराज यांच्या विचारांवर आधारित पुस्तकाचं प्रकाशन मुंबईत करण्यात आलं, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. सर्वेक्षण पूर्ण, मागासवर्ग आयोगाकडे अहवाल सुपूर्द मराठा आरक्षणाबाबतचं सर्वेक्षण पूर्ण झालं असून, सर्वेक्षण करणाऱ्या पाच संस्थांनी अहवाल मागासवर्ग आयोगाकडे सोपवला आहे. येत्या 3 आणि 4 ऑगस्ट रोजी मागासवर्ग आयोगाने मराठा आराक्षणासंदर्भात विशेष बैठक बोलावली आहे. लातुरात सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न लातूर जिल्ह्यातल्या औसामध्ये 8 मराठा आंदोलनकांनी सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेनं जिल्ह्यांत खळबळ उडाली आहे. काल सकाळी आंदोलकांनी औसा तहसील कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली. मराठा आंदोलकांपैकी 8 आंदोलकांनी अंगावर रॉकेल ओतून एकत्रपणे आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी स्थानिक पोलिसांनी आंदोलकांना तात्काळ थांबवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान यानंतर आंदोलकांनी तहसील कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला. चाकण हिंसाचार प्रकरणी 4-5 हजार जणांवर गुन्हे पुण्यातल्या चाकणमध्ये मराठा आंदोलनावेळी झालेली तोडफोड आणि जाळपोळ ही स्थानिकांनी नव्हे तर बाहेरच्या लोकांनी केलीय, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. ग्रामीण भागातून आलेला जमाव, औद्योगिक कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी आलेले कामगार आणि चौक भागातील झोपडपट्ट्यांमधील काही टोळक्यांकडून हिंसाचार झाला असण्याची शक्यता आहे, असं पोलिसांनी म्हटलं आहे. दरम्यान, जाळपोळीप्रकरणी 4 ते 5 हजार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे-नाशिक एसटी बससेवा अद्यापही बंद चाकणमधील परिस्थिती निवळली असली, तरी एसटी महामंडळाची पुणे-नाशिक बससेवा अद्यापही बंद ठेवण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून एसटी प्रशासनाने एसटी बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. चाकणमध्ये मराठा आंदोलनादरम्यान एसटी बसेस पेटवण्यात आल्या होत्या. त्यामुळे खबरदारी म्हणून शिवाजीनगर बस स्थानकातून नाशिककडे आणि नाशिकहून पुण्याकडे जाणाऱ्या सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसत आहेत. आरक्षणासाठी मराठा समाजाचा एल्गार दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाने आरक्षणासाठी ठोक मोर्चे सुरु केले आहेत. आधी पन्नासहून अधिक मूक मोर्चे काढूनही सरकारला जाग न आल्याची टीका करत, मराठा क्रांती मोर्चाने अखेर ठोक मोर्चे काढण्याचा निर्णय घेतला आणि राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget