एक्स्प्लोर

एक लाख रुपये दंड आणि पंचांची थुंकी चाटा, अकोल्यातील दुसरे लग्न केलेल्या महिलेला जात पंचायतीची शिक्षा

दुसरे लग्न केलेल्या महिलेला पंचांची थुंकी चाटायची शिक्षा आणि एक लाख रुपयांचा दंड जात पंचायतीने सुनावल्याचा धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्यात घडला आहे. या प्रकरणी कडक कारवाई करावी अशी विनंती विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी केली आहे. 

मुंबई : अनेक कायदे केले तरी जात पंचायतीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. अशीच एक धक्कदायक घटना अकोला जिल्ह्यात घडल्याचं समोर आलं आहे. त्यामध्ये पीडित महिलेला जात पंचायतीने पंचांची थुंकी चाटायची शिक्षा दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रश्नावर विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांना एक पत्र लिहून कडक कारवाई करण्याची विनंती केली आहे. 

काय आहे प्रकरण? 
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील वडगाव या गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिलेने साईनाथ नागो बाबर याच्याशी 2011 साली विवाह केला होता. पतीच्या जाचाला कंटाळून तिने सन 2015 मध्ये न्यायालयातून रितसर घटस्फोट घेतला. पीडित महिलेने न्यायालयात जाणे तिच्या नाथजोगी जात पंचायतच्या पंचांना मान्य नव्हते. त्यांनी हा घटस्फोट धुडकावून लावला. दरम्यान पिंडीत महिलेने 2019 मध्ये अनिल जगन बोडखे या घटस्फोटीत व्यक्तीशी पुनर्विवाह केला. असा पुनर्विवाह पंचांनी अमान्य केला व जात पंचायतने तिला एक लाख रुपयांचा दंड केला. 

महाराष्ट्रातील पंचांनी एकत्र येऊन न्यायनिवाडा करत दारु, मटणावर ताव मारला आणि त्या परिवारास जात बहिष्कृत केले. पीडित महिलेने पहिल्या नवऱ्यासोबत रहावे, असा पंचांनी हेका कायम ठेवला. तसेच पंचांनी केळीच्या पानावर थुंकायचे व त्या महिलेने ते चाटायचे अशी शिक्षा पीडित महिलेला देऊन विकृतीचे दर्शन घडविले. 

डॉ. निलम गोऱ्हे यांचे गृहमंत्र्यांना पत्र
या प्रकरणी आता विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांना एक पत्र लिहिले आहे आणि या प्रकरणी कडक कारवाई करावी अशी विनंती केली आहे. अशा घटनां सातत्याने घडत असल्याने कठोरपणे कार्यवाही आणि जातपंचायत कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होण्यासाठी ठोस पावले उचलने आवश्यक आहे. तसेच जात पंचायतीचे बरेच प्रलंबित प्रश्न आहेत. घटना घडल्यानंतर प्रथमतः तक्रार देण्यासाठी कोणी पुढे येत नसल्याने गुन्हा दाखल करण्यास विलंब होतो आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे माहिती मिळताच पोलिसांनी स्वतः गुन्हा दाखल करण्याकरिता प्रयत्न करावा अशी मागणी डॉ. निलम गोऱ्हे यांनी केली आहे.

घटना नोंद झाल्यानंतर तक्रार नागरी हक्क संरक्षण कक्षाकडे ताबडतोब देऊन पुढील कार्यवाही जलद गतीने होण्यासाठी वेळेचे निर्बंध घालून देण्यात यावे. जात पंचायतीच्या केसेचा आढावा PCR नागरी हक्क संरक्षण पोलीस महानिरीक्षक यांनी दर पंधरा दिवसाला घेतला तर अशा घटना आटोक्यात आणण्यासाठी नक्कीच फायदा होईल. पोलीस ठाण्यात किंवा पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, सर्व जात पंचायतीच्या पंचांची माहिती गोळा कडून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची सूचना देण्यात यावी असंही डॉ. निलम गोऱ्हे यांनी या पत्रात म्हटलं आहे. 

महत्वाच्या बातम्या :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajan Teli joins Shinde Camp Shivsena: दसरा मेळाव्यालाच ठाकरेंची साथ सोडली, शिंदे गटाचा झेंडा हातात धरला, वर्षभरात पक्ष बदलणारे राजन तेली कोण?
दसरा मेळाव्यालाच ठाकरेंची साथ सोडली, शिंदे गटाचा झेंडा हातात धरला, वर्षभरात पक्ष बदलणारे राजन तेली कोण?
विमानाने दिल्ली गाठायचे, अलिशान कार चोरुन महाराष्ट्रात विकायचे; टोळीकडून फॉर्च्यूनर, क्रेटासह 5 गाड्या जप्त
विमानाने दिल्ली गाठायचे, अलिशान कार चोरुन महाराष्ट्रात विकायचे; टोळीकडून फॉर्च्यूनर, क्रेटासह 5 गाड्या जप्त
ठाण्यावरुन बोरिवलीला अवघ्या 12 मिनिटांत पोहोचवणाऱ्या बोगद्याबाबत महत्वाची अपडेट, सरकारने एमएमआरडीएला 210 कोटी रुपये पाठवले
मुंबईकरांचा वेळ वाचणार, ठाणे ते बोरिवली अवघ्या 12 मिनिटांत गाठता येणार? दुहेरी बोगद्याबाबत मोठी अपडेट
US Vs India : ट्रम्प यांनी भडकावले, भारताच्या विरोधात प्लॅन बनवत आहेत 'हे' सात शक्तिशाली देश
ट्रम्प यांनी भडकावले, भारताच्या विरोधात प्लॅन बनवत आहेत 'हे' सात शक्तिशाली देश
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

RSS 100 years: Documentary on Rashtriya Swayamsevak Sangh: शतसाधना :संघ एक, अध्याय अनेक Shatsadhana
Manoj Jarange Dasara Melava : राज्यभरातून शेतकरी बैठकीला बोलावू, आंदोलन सुरु करु; जरांगेंचा इशारा
Manoj Jarange Dasara Melava : त्या राज ठाकरेकडे कमी आहे का? त्याची प्रॉपर्टी कापाना...जरांगे कडाडले
Manoj Jarange Dasara Melava : हेक्टरी 70 हजार ते 100 टक्के भरपाई...मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange Dasara Melava : दिवाळीआधी ओला दुष्काळ जाहीर करा, मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajan Teli joins Shinde Camp Shivsena: दसरा मेळाव्यालाच ठाकरेंची साथ सोडली, शिंदे गटाचा झेंडा हातात धरला, वर्षभरात पक्ष बदलणारे राजन तेली कोण?
दसरा मेळाव्यालाच ठाकरेंची साथ सोडली, शिंदे गटाचा झेंडा हातात धरला, वर्षभरात पक्ष बदलणारे राजन तेली कोण?
विमानाने दिल्ली गाठायचे, अलिशान कार चोरुन महाराष्ट्रात विकायचे; टोळीकडून फॉर्च्यूनर, क्रेटासह 5 गाड्या जप्त
विमानाने दिल्ली गाठायचे, अलिशान कार चोरुन महाराष्ट्रात विकायचे; टोळीकडून फॉर्च्यूनर, क्रेटासह 5 गाड्या जप्त
ठाण्यावरुन बोरिवलीला अवघ्या 12 मिनिटांत पोहोचवणाऱ्या बोगद्याबाबत महत्वाची अपडेट, सरकारने एमएमआरडीएला 210 कोटी रुपये पाठवले
मुंबईकरांचा वेळ वाचणार, ठाणे ते बोरिवली अवघ्या 12 मिनिटांत गाठता येणार? दुहेरी बोगद्याबाबत मोठी अपडेट
US Vs India : ट्रम्प यांनी भडकावले, भारताच्या विरोधात प्लॅन बनवत आहेत 'हे' सात शक्तिशाली देश
ट्रम्प यांनी भडकावले, भारताच्या विरोधात प्लॅन बनवत आहेत 'हे' सात शक्तिशाली देश
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 ऑक्टोबर 2025 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 ऑक्टोबर 2025 | गुरुवार 
दसऱ्यामुळं ट्रॅ्क्टर धुवायला गेले, गंगापूरमधील तलावात 4 मुले बुडाली; गावावर शोककळा
दसऱ्यामुळं ट्रॅ्क्टर धुवायला गेले, गंगापूरमधील तलावात 4 मुले बुडाली; गावावर शोककळा
Late Motherhood Challenges: कतरिना कैफ 42 व्या वर्षी आई होणार, सर्वसामान्य स्त्रियांना इतक्या उशीरा बाळ होऊ शकतं का?
कतरिना कैफ 42 व्या वर्षी आई होणार, सर्वसामान्य स्त्रियांना इतक्या उशीरा बाळ होऊ शकतं का?
Dasara Melava: बीडमधील कुठल्या दसरा मेळाव्याला किती गर्दी? पाटील-मुंडेंनी मैदान गाजवलं, पाहा फोटो
बीडमधील कुठल्या दसरा मेळाव्याला किती गर्दी? पाटील-मुंडेंनी मैदान गाजवलं, पाहा फोटो
Embed widget