चौकशी सुरु असेपर्यंत संजय राठोड यांच्या राजीनाम्याबद्दल बोलणं उचित ठरणार नाही : गुलाबराव पाटील
संजय राठोड यांची चौकशी सुरु आहे, चौकशीत ते दोषी आढळले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होईलच, असं शिवसेना नेते गुलाबराव पाटील म्हणाले
जळगाव : "संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याची माहिती मला माध्यमातूनच मिळाली आहे. राठोड यांच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत. त्यांची चौकशी सुरु आहे, चौकशीत ते दोषी आढळले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होईलच मात्र तोपर्यंत अधिक बोलणं उचित होणार नाही," अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजपने राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेतलं. त्यानंतर संजय राठोड यांनी आज राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवल्याची चर्चा रंगू लागली. परंतु राठोड यांच्या राजीनाम्याचं वृत्त खोडसाळपणाचं असल्याचं यवतमाळ जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांनी सांगितलं.
Pooja Chavan Suicide Case | विदर्भातील काही शिवसेना नेते राठोड यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही
संजय राठोड यांच्याविषयी गुलाबराव पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, "मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांच्या चौकशीचे आदेश दिले असून चौकशीत दोषी आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल."
"हे आरोप आहेत. आरोप झाल्यामुळे त्यांची चौकशी सुरु आहे. राठोड सध्या कुठे आहेत आपल्याला माहित नाही. गेल्या दोन-तीन दिवसांपासून आपण मतदारसंघात व्यस्त आहोत. आज आपण मुंबईला जात आहोत. त्यांची माहिती मिळाली तर आपल्याला सांगेन," असंही गुलाबराव पाटील म्हणाले.
Pooja Chavan Suicide Case|मुलीच्या मृत्यूमुळे उठलेल्या वादंगावर वडिलांची पहिली प्रतिक्रिया EXCLUSIVE
दुसरीकडे पूजा चव्हाणच्या वडिलांनी एबीपी माझाला आपली पहिली प्रतिक्रिया देताना माझ्या मुलीचा मृत्यू हा आर्थिक विवंचनेतून झाला असल्याचं म्हटलं होतं. तसेच ती गेल्या काही दिवसांपासून तणावात होती आणि त्याचं कारण तिच्यावर असलेलं कर्ज होतं, असंही ते म्हणाले होते.
Sanjay Raut | संजय राठोड यांच्याविषयी शिवसेनेत कुठलेही गट नाहीत : संजय राऊत
दरम्यान जळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री गुलाबराव पाटील यांचं ट्विटर हॅण्डल हॅक झाल्याचं समोर आलं आहे. समर्थकांनी काल रात्री ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर गुलाबराव पाटील यांनी आज या विषयी पोलिसात तक्रार दिली. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
Sanjay Rathod | संजय राठोड यांच्या राजीनाम्याबद्दल बोलणे आता योग्य नाही : गुलाबराव पाटील