तुम्ही IAS न निवडता IRS का निवडलं? विद्यार्थ्यांचे प्रश्न, समीर वानखेडेंची उत्तरं
तुम्हाला नोकरीत आल्याचा पश्चाताप होतोय का ? केंद्रीय तपास संस्थांवर होत असलेल्या आरोपां बाबत काय वाटत ? यासह अनेक प्रश्नांना आज समीर वानखेडे यांनी सडेतोड उत्तरे देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
Sameer wankhede : तुम्हाला नोकरीत आल्याचा पश्चाताप होतोय का ? केंद्रीय तपास संस्थांवर होत असलेल्या आरोपां बाबत काय वाटत ? यासह अनेक प्रश्नांना आज समीर वानखेडे यांनी सडेतोड उत्तरे देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.. आर्यन खान प्रकरणानंतर चर्चेत आलेले आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे युवक - युवतींना करिअर विषयक मार्गदर्शन केले. शिव प्रहार प्रतिष्ठाण या सामाजिक संघटनेच्या वतीने करिअर गाईडन्स सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना समीर वानखेडे यांनी दिलखुलास उत्तरे दिली.
अँटीला प्रकरणानंतर काही राजकीय लोक प्रसार माध्यमांमधून माझ्यावर तुटून पडले होते.. तेंव्हा नितीन चौगुले आणि सुरज आगे यांनी माझ्या ऑफिससमोर पुष्पवृष्टी केली.. त्यानंतर मला खूप प्रोत्साहन वाटले.आज त्यांच्या आग्रहाखातर श्रीरामपूरच्या युवकांना मार्गदर्शन करायला आलो, असे समीर वानखेडे म्हणाले.
मी माझ्या आयुष्यात साडेतीन हजार केसेस केल्यात.. प्रसार माध्यमांमध्ये ज्यांना सेलिब्रिटी दाखवले जाते ते लोक माझ्यासाठी सेलिब्रिटी नाहीत... पेपर मध्ये नाव येण्यासाठी मी फक्त सेलिब्रिटी लोकांना पकडतो अशी टिका केली जाते.. माझ्या आयुष्यात बाबा आमटे, एपीजे अब्दुल कलाम, सिंधुताई सपकाळ हे लोक सेलिब्रिटी आहेत... दाऊदच्या भावावरती कारवाया केल्या, गॅंग संपवल्या हे कुणीच सांगत नाही... एक छोटीशी केस झाली आणि त्यानंतर टिका, चौकशी सुरू झाली... ठीक आहे.. चिखलात हात टाकले तर शिंतोडे उडणारच आहेत.