IRS अधिकारी अनंत तांबेंचं कोरोनानं निधन
IRS अधिकारी अनंत तांबे यांचं कोरोनामुळं निधन झालं आहे. ते अवघ्या 32 वर्षांचे होते. त्यांच्यावर औरंगाबादमध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे ते अतिरिक्त खाजगी सचिव म्हणून काम पाहत होते.

मुंबई : IRS अधिकारी अनंत तांबे यांचं कोरोनामुळं निधन झालं आहे. ते अवघ्या 32 वर्षांचे होते. त्यांच्यावर औरंगाबादमध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे ते अतिरिक्त खाजगी सचिव म्हणून काम पाहत होते. तांबे यांच्या निधनानंतर मंत्री जावडेकर यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे.
जावडेकर यांनी म्हटलं आहे की, श्री. तांबे यांच्या अचानक आणि अकाली निधनामुळे फार दु:खी आहे. कोविडमुळे वयाच्या 32 व्या वर्षी अनंत तांबे यांचे निधन झाले. ते अतिरिक्त पीएस म्हणून काम करत होते. एक तरुण आणि तेजस्वी आयआरएस अधिकारी गमावल्याचं दु:ख आहे. माझ्या प्रार्थना त्याच्या कुटुंबासमवेत आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.
Deeply pained on the sudden and untimely demise of Sh. Anant Tambe at the age of 32 due to COVID.
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) May 3, 2021
Working as Additional PS, he was a young and bright IRS officer.
My prayers are with his family.
Om Shanti🙏
तांबे हे चांगले अधिकारी म्हणून परिचीत होते. केंद्रात प्रतिनियुक्तीला जाण्यापूर्वी ते पुण्यात तैनात होते.






















