एक्स्प्लोर
कोण होणार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु?
![कोण होणार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु? Interview Starts For Vice Chancellor Of Savitribai Phule Pune University Latest Updates कोण होणार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/10152942/Pune-University.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरु पदासाठी आजपासून पुण्यात मुलाखती सुरु झाल्या आहेत. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीमार्फत आज आणि उद्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरु डॉ. वासुदेव गाडे यांचा कार्यकाळ येत्या 15 तारखेला संपणार आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने नव्या कुलगुरु निवडीसाठी मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे.
कुलगुरुपदासाठी एकूण 90 अर्ज आले होते. त्यांच्या छाननीनंतर एकूण 36 उमेदवारांची निवड मुलाखतीसाठी करण्यात आली. प्रा. एम. राजीवलोचन, प्रा. भूषण पटवर्धन, प्रा. अंजली क्षीरसागर अशी काही नावं या 36 जणांच्या यादीत पाहायला मिळत आहेत.
शिक्षण क्षेत्रात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सुप्रसिद्ध आहे. शिवाय ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ अशीही या विद्यापीठाचे ओळख आहे. त्यामुळे अर्थात कुलगुरुपदाचा मान कुणाला मिळतो, याकडे संपूर्ण शिक्षण क्षेत्राचं लक्ष लागलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)